Lokmat Money > बिझनेस न्यूज > इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार?

इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार?

...तर मुकेश अंबानी आणि इलॉन मस्क एकत्रितपणे महाराष्ट्रात टेस्लाचा प्लांट सुरू करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:31 PM2024-04-10T15:31:09+5:302024-04-10T15:31:49+5:30

...तर मुकेश अंबानी आणि इलॉन मस्क एकत्रितपणे महाराष्ट्रात टेस्लाचा प्लांट सुरू करू शकतात.

Will Elon Musk-Mukesh Ambani come together, will Tesla make electric cars in partnership with Reliance joint venture for tesla plant in india | इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार?

इलॉन मस्क-मुकेश अंबानी सोबत येणार, Tesla रिलायन्सच्या साथीनं इलेक्ट्रिक कार बनवणार?

सध्या टेस्ला भारतात येणार ,अशी जबरदस्त चर्चा सुरू आहे. यापूर्वी, टेस्लाची एक टीम जागेची पाहणी कण्यासाठी भारतात आल्याचे वृत्त होते. यानंतर, टेस्लाची भारतातील एन्ट्री जवळपास निश्चित झाल्याचे इलॉन मस्क (Elon Musk) यांनी म्हटले होते. महत्वाचे म्हणजे, इलॉन मस्क टेस्ला प्लांटसाठी भारतात जवळपास 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक करू शकतात असे बोलले जात आहे. यासंदर्भात काही राज्यासोबत चर्चाही सुरू आहे.

यातच आता, टेस्ला (Tesla) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) यांच्यात जॉइंट व्हेंचरसंदर्भात चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. जर हे प्रत्यक्षात उतरले तर मुकेश अंबानी आणि इलॉन मस्क एकत्रितपणे महाराष्ट्रात टेस्लाचा प्लांट सुरू करू शकतात.

अंबानी यांची ऑटोमोबाइल क्षेतात उतरण्याची इच्छा नाही - 
द हिंदू बिझनेस लाइनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत येण्यासाठी टेस्ला एखाद्या स्थानीय पार्टनरच्या शोधात आहे. आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी त्यांची जवळपास एक महिन्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत चर्चा सुरू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. सध्या मुकेश अंबानी यांची ऑटोमोबाइल क्षेत्रात उतरण्याची इच्छा नाही. मात्र, ते इलेक्ट्रिक व्हेहिकल (EV in India) तयार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी उत्सुक आहेत.

काही राज्यांसोबत सुरू आहे चर्चा - 
महत्वाचे म्हणजे, माध्यमांतील वृत्तांनुसार, या जॉइंट व्हेंचरमध्ये अथवा या संयुक्त उपक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजची भूमिका काय असेल? हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, रिलायन्स टेस्लाला प्लांट तयार करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित इकोसिस्टम विकसित करण्यासाठी पूर्णपणे मदत करेल, असे मानले जात आहे. एवढेच नाही, तर टेस्ला आपल्या प्लांटसाठी गुजरात आणि महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये जमीन शोधत आहे. तसेच ते आपल्या भारतातील प्लांटवर जवळपास 2 अब्ज डॉलर एवढा खर्च करणार असल्याचा दावाही केला जात आहे.
 

Web Title: Will Elon Musk-Mukesh Ambani come together, will Tesla make electric cars in partnership with Reliance joint venture for tesla plant in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.