Lokmat Money > बिझनेस न्यूज > परदेशी गुंतवणूकदार परतणार का? बाजारात करेक्शनची आशा, अमेरिकेतील कपातीकडेही लक्ष

परदेशी गुंतवणूकदार परतणार का? बाजारात करेक्शनची आशा, अमेरिकेतील कपातीकडेही लक्ष

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या शेअर बाजारामध्ये येत्या काही दिवसांमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाजार काहीसा खाली गेला, तर परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडे पुन्हा ओढा वाढण्याची शक्यता आहे.

By प्रसाद गो.जोशी | Published: September 2, 2024 02:38 PM2024-09-02T14:38:09+5:302024-09-02T14:38:55+5:30

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या शेअर बाजारामध्ये येत्या काही दिवसांमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाजार काहीसा खाली गेला, तर परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडे पुन्हा ओढा वाढण्याची शक्यता आहे.

Will foreign investors return? Hope for correction in the market, attention to cuts in America | परदेशी गुंतवणूकदार परतणार का? बाजारात करेक्शनची आशा, अमेरिकेतील कपातीकडेही लक्ष

परदेशी गुंतवणूकदार परतणार का? बाजारात करेक्शनची आशा, अमेरिकेतील कपातीकडेही लक्ष

- प्रसाद गो. जोशी
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या शेअर बाजारामध्ये येत्या काही दिवसांमध्ये करेक्शन येण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाजार काहीसा खाली गेला, तर परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडे पुन्हा ओढा वाढण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहामध्ये पीएमआय, तसेच वाहन खरेदीचे आकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी व परकीय वित्तसंस्थांची कामगिरी यावर बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.

गत सप्ताहामध्ये बाजारात चांगलीच तेजी बघावयास मिळाली. बाजाराचा सेन्सेक्स १२७९.५६ अंशांनी वाढून ८२,३६५.७७ अंशांवर, तर निफ्टी ४१२.७५ अंशांनी वाढून २५,२३५.९० अंशांवर पोहोचला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही  अनुक्रमे ७४३.४४ व ३३९.६६ अंशांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा सत्रांमध्ये सेन्सेक्स २.३४ टक्के, तर निफ्टीमध्ये ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

या सप्ताहामध्ये वाहन विक्री, तसेच पीएमआयचे आकडे जाहीर होणार आहेत. त्यांच्यावर, तसेच जागतिक क्षेत्रातील शेअर बाजारांमधील वातावरण, अमेरिकेकडून दरात होणारी संभाव्य कपात कशी असेल, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर याच्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे. परकीय वित्तसंस्थांकडून नफा कमविण्यासाठी विक्री होणक्याचा रंग दिसत आहे. 

खरेदीत लक्षणीय घट
ऑगस्टमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये केलेल्या शेअर्सची खरेदी घटल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यामध्ये या संस्थांनी २६,५६५ कोटी रुपयांची, तर जुलैमध्ये  ३२,३६५ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. त्यामानाने ऑगस्ट महिन्यामध्ये अवघे ७३२० कोटी रुपये परकीय संस्थांना भारतीय शेअर्समध्ये गुंतविले. 

Web Title: Will foreign investors return? Hope for correction in the market, attention to cuts in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.