Join us

सोनं 50 हजारांपेक्षा कमी होईल का? देशपातळीवरील तज्ञ म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:27 PM

अनेकांनी सोने 60 हजार पार जाणार म्हणून 56000 वर असतानाच सोने खरेदी केले. मात्र, आता सोने 52000 वर घुटमळत असल्याने मनाला हुरहूर लागली आहे.

नवी दिल्ली - कोरोना काळात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यामध्ये मोठी घसरणही पहायला मिळत आहे. चढ उतारांमुळे सोन्याचे दर अस्थिर असले तरीही लग्न, सोहळे आदींसाठी सोन्याची खरेदी करणे गरजेचे असते. सोन्याचे दर वाढल्याने अनेकांनी ठरलेले लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. तर काहींनी बजेट तेवढेच ठेवले असले तरीही सोने कमी तोळ्यांमध्ये खरेदी करावे लागत आहे. सोन्याचे दर कुठपर्यंत खाली येणार, 50 हजारांपेक्षा कमी होतील का? यासंदर्भात काही तज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.   

अनेकांनी सोने 60 हजार पार जाणार म्हणून 56000 वर असतानाच सोने खरेदी केले. मात्र, आता सोने 52000 वर घुटमळत असल्याने मनाला हुरहूर लागली आहे. अशावेळी सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर काही काळ वाट पाहणेच हिताचे ठरणार आहे. गेल्या आठवड्याच सोने आणि चांदीच्या दरात जवळपास 1000 रुपयांची घट झाली. सध्या सोने 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62 हजार रुपये प्रति किलो आहे. जाणकारांनुसार पुढील काळात सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये घट होणार आहे. HDFC सेक्युरिटीच वरिष्ठ विश्लेषक म्हणतात की, अमेरिका व चीनमधील वाढता तणाव आणि कोरोना लसीनिर्मित्तीची सकारात्मकतेमुळे सोन्याच्या दरात आणखी घट होईल.  

सराफ बाजाराती तज्ञ असलेले कुणाल शहा म्हणतात की, ज्यांना सोने खरेदी करायचे आहे, त्यांनी थोडीसी वाट पहावी. कारण, सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी होईल, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. 

कोटक सिक्युरिटीजचे रविंद्र राव यांनी सोनं खरेदीची हीच ती योग्य वेळ असल्याचं म्हटलंय. ट्रेडेड फंड (ईटीएफ) च्या माध्यमातून सोन्या गुंतवणुकीत वाढ अपेक्षित आहे. या वर्षाअखेरीस सोन्याची किंमत 60 हजार होईल, असे भाकित मार्केटच्या परिस्थितीवर राव यांनी वर्तवले आहे. 

दरम्यान, जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये मोठे उतार-चढाव पहायला मिळत आहेत. याचा परिणाम अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. काही देश कोरोना संकटातील मंदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तिथे सोन्यामधील गुंतवणूक घटू लागली आहे. त्याच्या उलट अनेक देशांमध्ये कोरोना संकट आणि अर्थव्यवस्थेची हालत गंभीर आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. 5 ऑगस्टला चांदी 74000 वर होती तर सोने 6 ऑगस्टला 58 हजाराच्या जवळ होते. 

सोन्या दरातील चढ-उतारामुळे सोनारही मेटाकुटीला आले आहेत. सोने चांदीच्या दरामध्ये चढउतार पाहून ग्राहकही सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. सोने खरेदीसाठी वाट पाहत आहेत. यासाठी चांगली वेळ कोणती, याच्या शोधात ग्राहक आहेत. काही सोनारांच्या मते पुढील काळात सोन्या चांदीच्या दरात दीड ते दोन महिन्यांत घट होणार आहे. सोने जवळपास 48 हजार आणि चांदी 55 ते 57 हजार रुपयांपर्यंत येऊ शकते. कारण अनेक देशांमध्ये कोरोना लस पुढील काही महिन्यांत येणार आहे. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यामुळे बाजारातील सुस्ती जाणार असून लोक सोन्याऐवजी बँक किंवा अन्य क्षेत्रात पैसे गुंतवायला सुरुवात करणार आहेत. 

टॅग्स :सोनंकोरोना वायरस बातम्याचीनचांदीव्यवसाय