Lokmat Money > बिझनेस न्यूज > घराचा ईएमआय आणखी वाढणार का?

घराचा ईएमआय आणखी वाढणार का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला.

By प्रसाद गो.जोशी | Published: February 6, 2023 09:58 AM2023-02-06T09:58:32+5:302023-02-06T09:59:29+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला.

Will house EMI increase further know about it | घराचा ईएमआय आणखी वाढणार का?

घराचा ईएमआय आणखी वाढणार का?


भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणात व्याजदरांमध्ये वाढ करणार का? यावरच या सप्ताहात बाजाराचे प्रामुख्याने लक्ष असेल. याशिवाय परकीय वित्त संस्थांची भूमिका, विविध आस्थापनांचे जाहीर होणारे तिमाही निकाल, अदानी समूहावरील संकट यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहील.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १५१०.९८ अंशांनी वाढून ६०,८४१.८८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्ये ही सुमारे २५० अंशांची वाढ झाली. हा निर्देशांक १७८५४.०५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्माॅ लकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ झाली.

अर्थसंकल्पामुळे खाली आलेला बाजार गतसप्ताहात अस्थिर असला तरी बाजाराची प्रतिक्रिया सकारात्मक राहिली. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन बॅंकेने व्याजदर वाढविले असून, रिझर्व्ह बँक आता काय करते, याकडे लक्ष लागून आहे. अमेरिकेत विविध वस्तूंची वाढलेली मागणी बाजारावर सकारात्मक परिणाम करू शकते. त्याचा प्रभाव बाजारावर पडू शकतो.

देशांतर्गत वित्तसंस्थांची खरेदी
गत सप्ताहात परकीय वित्त संस्थांनी १४,४४५.०२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. जानेवारी महिन्यात त्यांनी मोठी विक्री केली. मात्र त्याचवेळी देशांतर्गत वित्त संस्थांनी १४,१८४.५१ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. त्यामुळेच परकीय वित्तसंस्थांनी विक्री करून ही बाजार वर गेला.

वाढत्या बाजारातही गुंतवणूकदार तोट्यात
गतसप्ताहात बाजाराचे प्रमुख निर्देशांक वाढले तरीही गुंतवणूकदारांना तोटा झाला आहे. बाजाराचे एकूण भांडवल मूल्य २,९३,२२१.६५ कोटी रुपयांनी कमी होऊन २,६६,७२,७४३.५३ कोटी रुपयांवर आले आहे. बाजारातील पहिल्या दहा कंपन्यापैकी नऊ कंपन्यांच्या भांडवलामध्ये वाढ झाली असून, केवळ रिलायन्सचे भांडवल घटले आहे. आयटीसीला सर्वाधिक फायदा झाला. इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅंक, टीसीएसचेही भांडवल वाढले. रिलायन्सचे भांडवल ५८८५.९७ कोटी रुपयांनी कमी झाल्याने गुंतवणूकदार मात्र गरीब झाले आहेत.

Web Title: Will house EMI increase further know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.