Join us

घरांच्या किमती कमी होणार का?; सणासुदीमुळे रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 12:18 AM

बाजारातील मरगळ झाली दूर

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने बाजारातील मरगळ दूर झाली. कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची सुचिन्हे दिसू लागली. सणासुदीच्या दिवसांत रिअल इस्टेट क्षेत्रालाही सुगीचे दिवस आले. घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रॉपर्टी सर्चचे प्रमाण कोविडपूर्वकाळापेक्षाही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. पाहू या काय आहे हा ट्रेण्ड...

सणासुदीच्या दिवसांत देण्यात आलेल्या सवलतींमुळे गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत. घर खरेदीत सवलत उपलब्ध असेल तरच व्यवहार करण्याची तयारी एक तृतियांशाहून अधिक गुंतवणूकदारांनी दर्शवली

सणासुदीच्या निमित्ताने सवलतींना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

रोख व्यवहारांवर सूटउपकरांवर सवलतीकाही मोफत ॲक्सेसरीजकल्पक योजनापैसे भरण्यासाठी ठरावीक कालावधीची मुदत

ऑनलाइनला महत्त्व

मालमत्ता शोधताना पोर्टल्सचा वापर अधिकव्हर्च्युअल टूर्सना प्राधान्यऑनलाइन डॉक्युमेंटेशनला पसंतीवैयक्तिक आवडीनिवडीनुसार घरांच्या जाहिराती पाहण्याला प्राधान्य

 

टॅग्स :घर