कसा ठरतो सोन्याचा दर?
सोन्याचा भाव आंतराष्ट्रीय पातळीवर प्रति औंस अमेरिकन डॉलरमध्ये ठरतो. सध्याचा भाव साधारण १८४० डॉलर प्रति औंस असा आहे.
डॉलर आणि रुपया मूल्य महत्त्वाचे
भारतातील सोन्याचा भाव हा डॉलर आणि रुपया याच्या विनिमयाचा दरावर अवलंबून असतो.
भविष्यात फायदा की तोटा?
सोन्याची मागणी वाढली आणि जर प्रति औंस भाव डॉलरमध्ये वाढला तर आणि डॉलरच्या तुलनेत रुपया जैसे थे किंवा घटला तर फायदा.
प्रति औंस डॉलरमध्ये भाव खाली आला आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला तर तोटा.
१ फेब्रुवारी २०१२ रोजी सोन्याचा भाव १७१० डॉलर प्रति औंस इतका होता. भारतात २८ हजार प्रति तोळा. १ फेब्रुवारी २०२२ रोजी हाच भाव १८३३ डॉलर प्रति औंस इतका होता. परंतु भारतात रुपयांमध्ये हाच भाव ४९,००० प्रती तोळा इतका वाढला.
म्हणजेच एकूण दहा वर्षांत डॉलरच्या तुलनेत सोन्याचा भाव कमी वाढला; परंतु भारतीय बाजारात हाच भाव रुपयांमध्ये ७० टक्क्यांनी वाढला. याचे एकमात्र कारण म्हणजे २०१२ साली ५३ रुपयांमध्ये १ डॉलर मिळायचा आणि आता एका डॉलरला ७५ रुपये मोजावे लागतात. याचाच अर्थ डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य घटले.