गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये Bisleri कंपनी विकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. बिस्लेरी कंपनीचे मालक रमेश चौहान हे ८२ वर्षाचे झाले आहेत, त्यांचा व्यवसाय पाहण्यासाठी पाठिमागे कोण नाही, त्यांची मुलगी जयंती चौहान यांचा या व्यवसायात इंटरेस्ट नाही, म्हणून ते कंपनी विकणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. पण, यावर पुन्हा कोणतीही अपडेट आलेली नाही. पण, मागील काही दिवसापासून जयंती चौहान या कंपनीच्या कामात एक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. त्यांनी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइन प्रोफाईलद्वारे बिस्लेरीची प्रत्येक अपडेट देत असतात.
Multibagger Share : ८ पैशांच्या शेअरनं १ लाखाचे केले ९.२६ कोटी, एक्सपर्ट म्हणाले….
बिस्लेरीने आपल्या ग्राहकांना अॅपद्वारे पाणी मागवण्याची सुविधा दिली आहे. गेल्या आठवड्यात, जयंती चौहान यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर ही योजना शेअर केली. ग्राहकांना डोरस्टेप अॅपद्वारे बिस्लेरीची पाण्याची बाटली ऑर्डर करण्याचे आवाहन केले आहे, आणि कंपनीच्या कर्मचार्यांचे कौतुक केले. बिस्लेरीने आयपीएल टीम मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससोबत भागीदारी केली आहे. जयंती चौहान यांनीही कंपनीच्या या पावलाचे कौतुक केले होते.
1969 मध्ये, चौहान कुटुंबाच्या नेतृत्वाखाली पार्ले, बिस्लेरी (इंडिया) लिमिटेड विकत घेतली. ही कंपनी ज्यावेळी रमेश चौहान यांनी विकत घेतली, तेव्हा ते फक्त 28 वर्षांचे होते. त्यावेळी बिस्लेरी कंपनीचा सौदा केवळ 4 लाख रुपयांना झाला होता. 1995 मध्ये त्याची कमान रमेश जे. चौहान यांच्या हाती आली. यानंतर पॅकेज्ड वॉटरचा व्यवसाय इतक्या वेगाने चालला की आता बाटलीबंद पाण्याची ओळख बनली आहे. भारतात पॅकेज्ड वॉटरची बाजारपेठ 20,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. यातील 60 टक्के असंघटित आहेत. संघटित बाजारपेठेत बिसलरीचा वाटा जवळपास 32 टक्के आहे.
रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान 37 वर्षांची आहे. जयंती चौहान यांचे बालपण दिल्ली, बॉम्बे आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात गेले. हायस्कूल चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी उत्पादन विकासाचा अभ्यास करण्यासाठी फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइझिंगमध्ये प्रवेश घेतला. ही संस्था लॉस एंजेलिसमध्ये आहे. जयंतीने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचेही शिक्षण घेतले आहे. जयंतीने अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मधून त्यांनी अरबीमध्ये पदवी देखील घेतली आहे.
वयाच्या 24 व्या वर्षी, जयंती यांनी बिस्लेरीचा व्यवसायत वडिलांच्या देखरेखीखाली हाताळण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्यांनी दिल्ली कार्यालयाचे काम सांभाळले. त्यांनी प्लांटचे नूतनीकरण केले आणि ऑटोमेशन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले. मजबूत कंपनीसाठी त्यांनी एचआर, सेल्स आणि मार्केटिंग सारखे विभाग तयार केले. 2011 मध्ये जयंती यांनी मुंबई कार्यालयाचा कार्यभारही स्वीकारला.