Join us  

19 जानेवारीला लॉन्च होणार बहुप्रतीक्षित Redmi Note 4 ?

By admin | Published: January 10, 2017 5:03 PM

चीनची कंपनी शिओमीचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Redmi Note 4 हा लवकरच भारतात लॉन्च होणार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - चीनची कंपनी शिओमीचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Redmi Note 4 हा लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने 19 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक इव्हेंट आयोजित केला आहे, या कार्यक्रमातच कंपनी हा फोन लॉन्च करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.    
 
Redmi Note हा शिओमीचा फ्लॅगशिप ब्रॅंड आहे. यापुर्वी आलेल्या Redmi Note च्या सर्वच फोनला भारतात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला .   दोन व्हेरिएन्ट्समध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे. यामध्ये  २ जीबी रॅम  आणि16 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत जवळपास 9 हजार रूपये असू शकते तर 3 जीबी रॅम आणि 64 जीबी  इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत जवळपास 12 हजार रूपये असण्याची शक्यता आहे. दोन्ही फोन ड्युएल सिमला सपोर्ट करतील.  गोल्ड, ग्रे आणि सिल्वर या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. 
 
Redmi Note 4  ची वैशिष्टये -
 
- फिंगरप्रिंट स्कॅनरसह इन्फ्रारेड सेन्सर 
- अॅन्ड्रॉइड  6.0 मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा फोन आधारीत असणार आहे.
- स्र्कीन 5.5 इंच ,2.5 डी कर्व्हड ग्लास आणि 401 पिक्सेल डेन्सिटी 
-13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा ,एलईडी फ्लॅश ऑटोफोकस असणार आहे. 
- जीपीआरएस / एज, 3जी, 4जी, ब्लूटूथ, जीपीआरएस  ही कनेक्टिविटीची साधने या फोनमध्ये उपलब्ध आहेत.