देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी आयडीबीआय बँकेतील एलआयसीचा हिस्सा विकण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. आयडीबीआय बँकेच्या प्रवर्तक एलआयसीनं म्हटलंय की बँक-विमा व्यवसायाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्यांना या बँकेतील काही हिस्सा राखून ठेवायचा आहे. सिद्धार्थ मोहंती यांनी आयडीबीआय बँकेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं.
“आम्ही हे स्पष्ट केलंय की आयडीबीआय बँक बँक-विम्यातील आमची आघाडीची भागीदार आहे. बँक विमा भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आम्ही आयडीबीआय बँकेतील आमचा काही हिस्सा राखून ठेवू,” असं मोहंती म्हणाले. बँक-विमा व्यवस्था ही बँक आणि विमा कंपनी यांच्यातील अशी तरतूद आहे ज्यामध्ये बँक शाखांद्वारे विमा उत्पादनांची विक्री केली जाते.
सरकार एलआयसीसोबत एकत्र येऊन आयडीबीआय बँकेतील आपल्या भागीदारीची धोरणात्मक निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या बँकेत सरकारची भागीदारी ४५ टक्के आहे आणि एलआयसीकडे ४९.२४ टक्के हिस्सा आहे. सरकार आणि एलआयसी मिळून ६० टक्के हिस्सा विकणार आहेत.
आयडीबीआय बँक जानेवारी २०१९ मध्ये एलआयसीची उपकंपनी बनली. दरम्यान, बँकेतील एलआयसीचा हिस्सा ४९.२४ टक्के केल्यानंतर, १९ डिसेंबर २०२० रोजी ती जीवन विमा कंपनीची उपकंपनी बनली.
LIC आयडीबीआय बँकेतील हिस्सा विकणार का? अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांचं मोठं वक्तव्य
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी आयडीबीआय बँकेतील एलआयसीचा हिस्सा विकण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:15 AM2023-11-29T10:15:29+5:302023-11-29T10:15:56+5:30