नवी दिल्ली : उत्पन्न व विकासावर होणाऱ्या खर्चाशी तडजोड न करता चालू वर्षात आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर सरकार ठाम असल्याचे सरकारने शुक्रवारी सांगितले.
अर्थ मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी जे लक्ष्य गाठावयाचे आहे, त्यात सरकार कसलीही तडजोड करणार नाही. त्यासाठी प्रभावी उपाय योजत असताना अधिक सजगतेने सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जाईल. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीय तोटा ४.८३ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजानुसार तोटा ८७ टक्के असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
माहितीत म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षातील तोटा ५.३५ लाख कोटी रुपये असेल व तो स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ३.९ टक्के राहील, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला होता. देशाचे उत्पन्न व खर्च यातील तफावत म्हणजे अर्थसंकल्पीय तोटा असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक स्थिती सुधारली असल्याचे सांगून पुढे म्हटले आहे की, गेल्या वर्षी याच काळात तोटा ९८.९ टक्क्यांपर्यंत गेला होता.
वित्तीय तोटा नोव्हेंबर २०१५ पर्यंत २,६४,४०४ कोटी रुपये होता. जो गेल्या वर्षी याच कालावधीतील तोट्यापेक्षा २० टक्क्यांनी वा ६५,०८७ कोटी रुपयांनी कमी आहे. अर्थसंकल्पात योजनेवरील खर्च १,३५,२५७ कोटी रुपये निर्धारित केला होता. त्यापैकी ९७,७८८ कोटी रुपये म्हणजे ७२ टक्के खर्च नोव्हेबरपर्यंत झाला आहे.
अर्थसंकल्पीय तूट कमी करण्याचे लक्ष्य कायम ठेवणार
उत्पन्न व विकासावर होणाऱ्या खर्चाशी तडजोड न करता चालू वर्षात आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर सरकार ठाम असल्याचे सरकारने शुक्रवारी सांगितले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 02:19 AM2016-01-16T02:19:08+5:302016-01-16T02:19:08+5:30