Join us

पुन्हा सत्तेत येताच अमेरिकेला बनवणार बिटकॉइन सुपरपॉवर; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 08:13 IST

राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांची बिटकॉइनबाबत भूमिका अगदी उलट होती. बिटकॉलइनला चलन मानण्यास ते तयार नव्हते.

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीत व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा निवडून आल्यास अमेरिकेला बिटकॉइन सुपरपॉवर बनविण्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिले. या उद्योगाला सर्व प्रकारचे लाभ मिळावेत यासाठी पारदर्शक नियमावली तयार करण्यासाठी एका विशेष सल्लागार परिषदेची नियुक्ती करण्याची घोषणाही त्यांनी केली. 

बिटकॉइन परिषदेसमोर ट्रम्प म्हणाले की, सत्तेत येताच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे अध्यक्ष गॅरी जेन्सलर यांना बरखास्त केले जाईल तसेच राष्ट्रीय बिटकॉइन रणनीतीक भंडाराची निर्मीती करण्यात येईल. विद्यमान सरकारमुळे बिटकॉइनशी जोडलेले व्यवसाय व नोकऱ्या देशाबाहेर जात आहेत. आम्ही बिटकॉईन उद्योगातील नोकऱ्या चालू ठेवू, असेही ट्रम्प म्हणाले.  (वृत्तसंस्था)

आधीची भूमिका काय?

राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांची बिटकॉइनबाबत भूमिका अगदी उलट होती. बिटकॉलइनला चलन मानण्यास ते तयार नव्हते. त्यांनी अनेकदा बिटकॉइनवर जाहीरपणे टीकाही केली होती. परंतु शनिवारी त्यांनी आपल्या भूमिकेत अचानक बदल केल्याचे दिसले. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्प