Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

mukesh ambani : उद्योगपती मुकेश अंबानी आता आणखी एका क्षेत्रात उतरणार आहे. ही डील यशस्वी झाल्यास मनोरंजन क्षेत्रात रिलायन्स ग्रुपची पकड वाढणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 01:26 PM2024-10-14T13:26:46+5:302024-10-14T13:28:12+5:30

mukesh ambani : उद्योगपती मुकेश अंबानी आता आणखी एका क्षेत्रात उतरणार आहे. ही डील यशस्वी झाल्यास मनोरंजन क्षेत्रात रिलायन्स ग्रुपची पकड वाढणार आहे.

Will Mukesh Ambani enter Bollywood? Deal with Karan Johar Dharma Productions? | मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

मुकेश अंबानी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत डील?

mukesh ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या-ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथं आपला बददबा निर्माण केल्याचा अनुभव सर्वांनाच आहे. त्यामुळेच तेलापासून खेळापर्यंत अनेक व्यवसायात ते एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आले आहेत. हेच मुकेश अंबानी आता बॉलिवूडमध्येही एन्ट्री करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मुकेश अंबानी यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधील हिस्सा विकत घेतल्याच्या बातम्या येत आहेत. असे झाल्यास भारतीय कंटेंट प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स ग्रुपची पकड अधिक मजबूत होईल.

काय आहे प्रकरण?
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उद्योगपती मुकेश अंबानी आता चित्रपट उद्योगात विस्तार करण्याची योजना आखत आहेत. वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांची आरआयएल आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधील भागभांडवल विकत घेण्याची चर्चा सुरू आहे. ही डील यशस्वी झाल्यास मनोरंजन क्षेत्रातील मुकेश अंबानी यांची पकड अधिक मजबूत होईल. हा करार मुकेश अंबानींच्या जिओ स्टुडिओ आणि वायाकॉम 18 स्टुडिओच्या विद्यमान मालमत्तांचा आणखी विस्तार करेल.

करण जोहरकडे किती हिस्सा?
करण जोहर धर्मा प्रॉडक्शनमधील आपला हिस्सा विकण्याचा अनेक दिवसांपासून विचार करत आहे. मात्र, मनासारखी किंमत मिळत नसल्याने हा करार थांबला आहे. धर्मा प्रॉडक्शनमध्ये सध्या करण जोहरची ९०.७% भागीदारी आहे. उर्वरित ९.७४ टक्के हिस्सा त्याची आई हुरी यांच्याकडे आहे. मुकेश अंबानी करण जोहरच्या हिस्स्यातील भाग खरेदी करणार असल्याची माहिती आहे.

अलीकडेच, आरआयएलने बालाजीमध्ये एक छोटासा हिस्सा विकत घेतला होता. धर्मासोबतही अशीच योजना असू शकते. जिओ स्टुडिओ, जो देशातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ आहे. यंदाच्या वर्षात या कंपनीने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ७०० कोटी रुपये कमावले आहेत. मॅडॉक चित्रपटासह त्यांची सह-निर्मिती असलेला स्त्री २ आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. रिलायन्स आणि धर्मा प्रॉडक्शनने अद्याप या कराराला प्रतिसाद दिलेला नाही.

करण जोहर का विकतोय हिस्सेदारी?
मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना महामारीमध्ये अनेक फिल्म प्रॉडक्शन हाऊसेस डबघाईला आले आहेत. या आर्थिक संटकावर मात करण्यासाठी अनेकजण निधी उभारण्याच्या योजनांवर विचार करत आहेत. धर्मा बहुसंख्य स्टेक विकण्यासाठी उद्योजक संजीव गोएंका यांच्या सारेगामा कंपनीशी चर्चा करत आहे. मात्र, सारेगामाने ८ ऑक्टोबर रोजी बीएसई फाइलिंगमध्ये त्यांच्याकडे अहवाल देण्यासाठी कोणतीही अपडेट नसल्याचे सांगितले होते.

महसूल चौपट वाढला
धर्मा प्रॉडक्शनचा महसूल कोरोनानंतर झपाट्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये धर्माची कमाई २७६ कोटी रुपये होती. यात जवळपास ४ पटीने वाढून २०२४ मध्ये १०४० कोटी रुपये झाला आहे. टॉफलरच्या आकडेवारीनुसार, खर्चात ४.५ पट वाढ झाल्यामुळे निव्वळ नफा १०४० कोटींवरून ५९% घसरून ११ कोटींवर आला आहे.

Web Title: Will Mukesh Ambani enter Bollywood? Deal with Karan Johar Dharma Productions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.