Join us

आता तरी स्वस्त होईल का पेट्रोल डिझेल? कच्च्या तेलाच्या दरात ३ दिवसांत १० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 11:04 AM

मागच्या आठवड्यात कच्चे तेल ८७ डॉलर प्रतिबॅरल होते, ते आता ७९ डॉलरवर घसरले आहे.

मुंबई : चीनमधील कोरोना आणि युरोपात जानेवारीत कमी पडलेली थंडी यामुळे कच्च्च्या तेलाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मागील ३ दिवसांत १० टक्के घसरण झाली आहे. यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.मागच्या आठवड्यात कच्चे तेल ८७ डॉलर प्रतिबॅरल होते, ते आता ७९ डॉलरवर घसरले आहे. कंपन्या तोटा झाल्याचा दावा करीत असल्यामुळे किमती उतरण्याची आशा बाळगणे कठीण आहे, असे तज्ज्ञांना वाटते.

पेट्रोलवर नफा, डिझेलवर तोटा! एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर १० रुपये नफा होत आहे. मात्र डिझेलच्या विक्रीवर प्रतिलिटर ६.५ रुपये नुकसान होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी मागील १५ महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सुधारणा केलेली नाही.

टॅग्स :पेट्रोल