नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, पायाभूत क्षेत्रातील उणिवा दूर करण्यासाठी सरकार आर्थिक सुधारणांना गती देईल.
भारत-ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेत भाषण करताना जेटली यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहोत. मात्र, आम्ही समाधानी नाही आहोत. आम्ही अधिक गतीने वृद्धी करू शकतो, याची आम्हाला जाणीव आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी, अर्थव्यवस्था अधिक खुली करण्यासाठी, अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, पायाभूत क्षेत्रातील उणिवा दूर करण्यासाठी सरकार हर तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे.
ते म्हणाले, २,२00 अब्ज डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था विस्तारत आहे. संरक्षणवादी आवाजांचा सर्वांत कमी प्रभाव तिच्यावर आहे. साधारणत: अल्प विकसित अथवा विकसनशील अर्थव्यवस्थांत संरक्षणवादी नारे अधिक प्रमाणात ऐकायला मिळतात. भारतात मात्र असे काही दिसून येत नाही. अर्थव्यवस्था अधिक खुली करणे हीच अर्थव्यवस्थेसाठीची दिशा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुधारणांना गती देणार - जेटली
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, पायाभूत क्षेत्रातील उणिवा दूर करण्यासाठी सरकार आर्थिक सुधारणांना गती देईल
By admin | Published: November 9, 2016 06:54 AM2016-11-09T06:54:23+5:302016-11-09T06:54:23+5:30