Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह

सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्याने येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By प्रसाद गो.जोशी | Published: July 1, 2024 09:23 AM2024-07-01T09:23:19+5:302024-07-01T09:23:37+5:30

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्याने येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Will Sensex go beyond 80 thousand Excitement from purchases by domestic financial institutions | सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह

सेन्सेक्स जाणार का ८० हजारांच्या पार? देशांतर्गत वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे उत्साह

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्याने येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात वाहन विक्री आणि पीएमआयची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांचे भाषण याच्या जोडीलाच परकीय वित्त संस्था आणि देशांतर्गत वित्तसंस्थांची कामगिरी याकडेही नजर आहे. आगामी अर्थसंकल्पामुळे ठराविक क्षेत्रांमध्ये तेजी वा मंदी राहू शकते.

गतसप्तामध्ये बाजार काहीसा नरम गरम होता. तरीही सेन्सेक्सने ७९ हजारांचा पार केलेला टप्पा आणि सर्वच निर्देशांक हिरव्या रंगामध्ये बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. मात्र, परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीवर देशांतर्गत वित्तसंस्थांची खरेदी अधिक राहिल्याने सप्ताहाचा विचार करता बाजार वाढलेला दिसून आला. 

परकीय संस्थांची विक्री

  • परकीय वित्तसंस्थांनी एक सप्ताहाच्या खरेदीनंतर पुन्हा विक्रीचा पवित्रा घेतलेला दिसतो. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी १४,७०४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केलेली दिसून येते. यामुळे बाजार काही प्रमाणामध्ये खाली आला होता.
  • परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीला देशांतर्गत वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून उत्तर दिले. देशांतर्गत संस्थांनी गतसप्ताहामध्ये बाजारात २०,७९६ कोटी ओतले. 
  • परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीचा फारसा फटका बाजाराला बसला नाही. बॉण्डमध्ये मात्र परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक सुरू आहे.

Web Title: Will Sensex go beyond 80 thousand Excitement from purchases by domestic financial institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.