नवी दिल्ली – आपल्या सर्वांचं आवडतं फरसाण बनवणारी कंपनी हल्दीराम(Haldiram) विक्रीस निघाली आहे. टाटा समूहची एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडेक्ट्ससोबत याबाबत चर्चा सुरू आहे. १९३७ मध्ये सुरु झालेली चवदार फरसाण आणि मिठाईची रिटेल चेन कंपनी हल्दीरामचे टाटा समूह प्रमुख भागीदार होण्याच्या तयारीत आहेत.
रॉयटर्सनुसार, हल्दीराम आणि टाटा कंझ्युमर यांच्यात डिलबाबत चर्चा सुरू आहे. टाटा हल्दीराममध्ये ५१ टक्के भागीदारी विकत घेण्याच्या तयारीत आहे. या हिस्स्यासाठी हल्दीराम यांच्याकडून १० बिलियन डॉलर म्हणजे ८,३१,४३,५०,००,००० कोटी रुपये व्हॅल्यूएशन डिमांड करण्यात आली आहे. या व्हॅल्यूएशनबाबत सध्या व्यवहार थांबला आहे. टाटा कंझ्युमरनुसार हल्दीराम यांनी या डिलसाठी केलेली डिमांड जास्त आहे. व्हॅल्यूएशनबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये सहमती बनली नाही. परंतु दोघांमध्ये योग्य दराबाबत सहमती बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जर ही डिल झाली तर टाटा समूह रिलायन्स रिटेल आणि आयटीसी कंपन्यांना तगडी टक्कर देऊ शकतो. हल्दीरामची भागीदारी खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या रांगेत आहेत. टाटाने ५१ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे तर हल्दीराम १० टक्के भागीदारी विकून बॅन कॅपिटलसह काही खासगी इक्विटी फर्मसोबत चर्चा करत आहे. परंतु या डिलबाबत अद्याप टाटा कंझ्युमर आणि हल्दीराम यांच्याकडून अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.