Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘तिसऱ्या’च्या नावे येईल का उघडता खाते?; मुलांच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर..

‘तिसऱ्या’च्या नावे येईल का उघडता खाते?; मुलांच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर..

दोन मुले असल्यास एका मुलासाठी आई आणि दुसऱ्यासाठी वडील खाते उघडू शकतात. तिसऱ्या अपत्यासाठी मात्र ही सवलत मिळत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 08:27 AM2023-09-23T08:27:55+5:302023-09-23T08:28:11+5:30

दोन मुले असल्यास एका मुलासाठी आई आणि दुसऱ्यासाठी वडील खाते उघडू शकतात. तिसऱ्या अपत्यासाठी मात्र ही सवलत मिळत नाही.

Will the account be opened in the name of the 'third party'?; If you want to invest in the name of children.. | ‘तिसऱ्या’च्या नावे येईल का उघडता खाते?; मुलांच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर..

‘तिसऱ्या’च्या नावे येईल का उघडता खाते?; मुलांच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर..

नवी दिल्ली - तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज मिळते. मुलगा/मुलगी मोठे होईपर्यंत यातून मोठी रक्कम उभी राहू शकते. एक व्यक्ती एकच पीपीएफ खाते उघडू शकतो. याशिवाय एका अल्पवयीन मुलाच्या नावे एक खाते उघडता येते. मात्र, दोन मुले असल्यास एका मुलासाठी आई आणि दुसऱ्यासाठी वडील खाते उघडू शकतात. तिसऱ्या अपत्यासाठी मात्र ही सवलत मिळत नाही.

१८ वर्षांनंतर सूत्रे मुलांच्या हाती
मुले १८ वर्षांची झाल्यानंतर या खात्याचे स्वरूप ‘अज्ञान’वरून बदलून ‘सज्ञान’ करावे लागते. त्यानंतर मुले स्वत:च ही खाती चालवू शकतात. उच्चशिक्षण अथवा उपचार या कारणांसाठी विशेष स्थितीत ५ वर्षांनंतर खाते बंद करता येते.

१५ वर्षांचा पक्वता कालावधी
मुलांचे पीपीएफ खाते हे पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. या खात्याचा परिपक्वता कालावधी १५ वर्षांचा असतो. नंतर ५-५ वर्षांसाठी त्याची मुदत वाढवून घेता येते.

५०० रुपयांत उघडता येते खाते
अवघ्या ५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर पीपीएफ खाते उघडता येते. जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक १.५ लाख रुपयांची करता येते. मात्र, आई-वडिलांचे स्वत:चेही खाते असल्यास अपत्य व पालक या दोघांची मिळून कमाल गुंतवणूक मर्यादा १.५ लाख रुपयेच असेल.

Web Title: Will the account be opened in the name of the 'third party'?; If you want to invest in the name of children..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.