नवी दिल्ली - तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत वार्षिक ७.१ टक्के दराने व्याज मिळते. मुलगा/मुलगी मोठे होईपर्यंत यातून मोठी रक्कम उभी राहू शकते. एक व्यक्ती एकच पीपीएफ खाते उघडू शकतो. याशिवाय एका अल्पवयीन मुलाच्या नावे एक खाते उघडता येते. मात्र, दोन मुले असल्यास एका मुलासाठी आई आणि दुसऱ्यासाठी वडील खाते उघडू शकतात. तिसऱ्या अपत्यासाठी मात्र ही सवलत मिळत नाही.
१८ वर्षांनंतर सूत्रे मुलांच्या हातीमुले १८ वर्षांची झाल्यानंतर या खात्याचे स्वरूप ‘अज्ञान’वरून बदलून ‘सज्ञान’ करावे लागते. त्यानंतर मुले स्वत:च ही खाती चालवू शकतात. उच्चशिक्षण अथवा उपचार या कारणांसाठी विशेष स्थितीत ५ वर्षांनंतर खाते बंद करता येते.
१५ वर्षांचा पक्वता कालावधीमुलांचे पीपीएफ खाते हे पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. या खात्याचा परिपक्वता कालावधी १५ वर्षांचा असतो. नंतर ५-५ वर्षांसाठी त्याची मुदत वाढवून घेता येते.
५०० रुपयांत उघडता येते खातेअवघ्या ५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर पीपीएफ खाते उघडता येते. जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक १.५ लाख रुपयांची करता येते. मात्र, आई-वडिलांचे स्वत:चेही खाते असल्यास अपत्य व पालक या दोघांची मिळून कमाल गुंतवणूक मर्यादा १.५ लाख रुपयेच असेल.