Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाळवंटातील आग सरकार विझवणार? व्यापार, संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारताचे संबंध अतिशय भक्कम

वाळवंटातील आग सरकार विझवणार? व्यापार, संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारताचे संबंध अतिशय भक्कम

व्यापार आणि संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारत आणि अरब देशांचे संबंध अतिशय भक्कम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:39 AM2022-06-08T08:39:48+5:302022-06-08T08:41:40+5:30

व्यापार आणि संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारत आणि अरब देशांचे संबंध अतिशय भक्कम आहेत.

Will the government extinguish the desert fire? India has strong ties on both trade and culture fronts. | वाळवंटातील आग सरकार विझवणार? व्यापार, संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारताचे संबंध अतिशय भक्कम

वाळवंटातील आग सरकार विझवणार? व्यापार, संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारताचे संबंध अतिशय भक्कम

नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारताला अरब देशांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अरब देशांच्या आक्षेपावर भारत सरकारला सतत स्पष्टीकरण द्यावे लागते. व्यापार आणि संस्कृती या दोन्ही आघाड्यांवर भारत आणि अरब देशांचे संबंध अतिशय भक्कम आहेत. भारतातील लाखो लोक नोकरी- उद्योगासाठी या देशांमध्ये असून, ते भारतात अब्जावधी रुपये पाठवतात. यासह इतर अनेक कारणांमुळे भारताला या वाळवंटातील देशांची नाराजी कोणत्याही स्थितीत परवडणारी नाही. त्यामुळेच भारताने तात्काळ कठोर पावले उचलली आहेत.

तेल आणि गॅससाठी भारत आखाती देशांवर अवलंबून
भारताला दररोज ५ दशलक्ष बॅरल तेल लागते आणि त्यातील ८५ टक्के आखाती देशांमधून येते. गेल्या काही वर्षांत आखाती देशांवरील तेलावरील अवलंबित्व कमी झाले असले, तरी भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा मोठा हिस्सा येथूनच येतो. 

सर्वाधिक भारतीय मजूर आखाती देशांमध्ये
- भारतातून मोठ्या प्रमाणात लोक नोकरीच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात. ९ आखाती देशांत सुमारे ९० लाख भारतीय लोक राहतात. 
- कतार, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये अनेक मोठी भारतीय रिटेल स्टोअर्स आणि रेस्टॉरंटस् आहेत.
- वक्तव्यामुळे या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय कामगारांवर आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार, हे स्पष्ट आहे. 

महाराष्ट्राला मोठा फायदा
परदेशातून येणारा सर्वाधिक पैसा म्हणजेच तब्बल ५९ टक्के हिस्सा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बंगाल या तीन राज्यांमध्ये येतो. यामुळेच आखाती देशांचा भावनिक मुद्दा भारताला हलक्यात घ्यावासा वाटत नाही.

भारताचा आखाती देशांशी मोठा व्यापार
संयुक्त अरब अमिराती, म्हणजेच यूएई, सौदी अरेबिया आणि कतार हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. एवढेच नाही तर यूएई हे भारतासाठी अमेरिकेनंतरचे दुसरे सर्वांत मोठे व्यापारी ठिकाण आहे.

भारताचा सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध
मक्का मदिना हे जगभरातील मुस्लिमांसाठी एक मोठे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अशा स्थितीत, इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतातून दरवर्षी लाखो लोक या पवित्र स्थळाला भेट देतात. सिंधू संस्कृतीच्या काळातही भारताचे आखाती देशांशी जवळचे संबंध होते. या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. तसेच व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

Web Title: Will the government extinguish the desert fire? India has strong ties on both trade and culture fronts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.