Join us

वाढणार का पीपीएफचा व्याजदर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:24 AM

सरकार पीपीएफ खातेधारकांना सुखद धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाच्या (पीपीएफ) व्याजदरात नव्या वर्षात वाढ केली जाऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. सरकारने एप्रिल २०२० पासून पीपीएफच्या व्याजदरात बदल झालेला नाही. तेव्हापासून तो ७.१ टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आलेला आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सरकारने या काळात वाढ केली. या योजनांच्या व्याजदरांचा दर ३ महिन्यांनी आढावा घेतला जातो. जाणकारांनी सांगितले की, यंदा निवडणूक वर्ष असल्यामुळे पीपीएफचा व्याज दर वाढविला जाऊ शकतो. जानेवारी-मार्च या तिमाहीसाठी पीपीएफच्या व्याज दरात २५ आधार अंकांची वाढ करून सरकार पीपीएफ खातेधारकांना सुखद धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :पीपीएफ