पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी 2021-2022 साठी कर्मचारीभविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदरात बदलाबाबत विधान केले आहे.
सरकार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर व्याजदर वाढवण्याबाबत पुनर्विचार करत आहे का?असा प्रश्न केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांना विचारण्यात आला, यावेळी उत्तर देताना, त्यांनी व्याजदराचा फेरविचार करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट सांगितले. म्हणजेच पीएफ खात्यावरील व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही.
भविष्य निर्वाह निधी (7.10 टक्के), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (7.40 टक्के) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना (7.60 टक्के) यासारख्या तुलनात्मक योजनांपेक्षा जास्त आहे. लहान बचत योजनांमधून पीएफवर मिळणारे व्याज अजूनही जास्त आहे, अशा परिस्थितीत पात्र सरकार व्याजदर वाढीचा विचार करणार नाही. EPF वर 8.10 टक्के व्याज देण्यास मान्यता देण्यात आली आहे, असंही कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले.
पीएफवरील व्याजदर हा ईपीएफला त्याच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि असे उत्पन्न केवळ ईपीएफ योजना, 1952 नुसार वितरित केले जाते. सीबीटी आणि ईपीएफ 2021-22 साठी , 8.10 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली होती, ज्याला सरकारने मान्यता दिली आहे, म्हणजेच यावेळी PF वर 8.10 दराने व्याज मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री तेली यांनी दिली.