Lokmat Money > बिझनेस न्यूज > गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला

गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला

देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 01:34 PM2023-12-22T13:34:06+5:302023-12-22T13:35:18+5:30

देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Will there be relief in the prices of wheat and rice To control prices, the government sold 3.5 lakh tonnes of wheat | गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला

गहू, तांदळाच्या दरात दिलासा मिळणार? किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ३.५ लाख टन गहू विकला

देशातील महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गहू आणि तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत किरकोळ दर नियंत्रित करण्यासाठी, सरकार आपल्या बफर स्टॉकमधून गहू आणि तांदूळ विकत आहे. या क्रमाने, सरकारने ई-लिलावाद्वारे घाऊक ग्राहकांना ३.४६ लाख टन गहू आणि १३,१६४ टन तांदूळ विकले आहेत. FCI ही सरकारची नोडल एजन्सी अन्नधान्य खरेदी आणि वितरणासाठी ई-लिलाव करते. केंद्राने मार्च २०२४ पर्यंत OMSS साठी १०१.५ लाख टन गव्हाचे वाटप केले आहे.

Youtube च्या एका आयडियानं मजुराचं आयुष्य बदललं; आज कमावतो लाखोंची कमाई

सरकारी निवेदनात म्हटले आहे की, २० डिसेंबर रोजी २६ वी ई-लिलाव झाली, यामध्ये ४ लाख टन गहू आणि १.९३ लाख टन तांदूळ देण्यात आला. ई-लिलावात ३.४६ लाख टन गहू आणि १३,१६४ टन तांदूळ अनुक्रमे २,१७८.२४ रुपये प्रति क्विंटल आणि २९०५.४० रुपये प्रति क्विंटल या सरासरी दराने विकले. तांदूळ, गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार गहू आणि तांदूळाच्या दोन्हीचा साप्ताहिक ई-लिलाव काढत आहे.

बोली लावणार्‍या तांदळाचे किमान प्रमाण एक टन आहे. तर जास्तीत जास्त २००० टनासाठी बोली लावली जाऊ शकते. बोलीदार OMSS अंतर्गत तांदळाच्या संदर्भात एक टनाच्या पटीत बोली लावू शकतात. OMSS अंतर्गत तांदळाची विक्री वाढवण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. सध्याच्या ई-लिलावात तांदळाची विक्री मागील ई-लिलावात विकलेल्या ३३०० टनांवरून १३,१६४ टन झाली आहे.

महिन्याच्या सुरुवातीला, अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले होते की, देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकार जानेवारी-मार्च २०२४ या कालावधीत OMSS अंतर्गत २५ लाख टन अतिरिक्त FCI गहू मोठ्या प्रमाणात ग्राहकांना ऑफलोड करण्यास तयार आहे.

Web Title: Will there be relief in the prices of wheat and rice To control prices, the government sold 3.5 lakh tonnes of wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.