गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाचे दर वाढले आहेत. यावर आता सरकारने तोडगा काढला आहे, केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून देशात कच्च्या तेलावरील विंडपॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा फक्त देशात काढलेल्या कच्चे तेल आणि डिझेलसाठी होणार आहे. त्यामुळे आता देशात इंधनाचे दर कमी होऊ शकतात.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. जागतिक बाजारपेठेत क्रुड ऑइलचे दर कमी झाले आहेत. यामुळे सरकारने निर्यातीवरील टॅक्स कमी झाले आहेत. त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशात उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. कारण हा टॅक्स फक्त देशांतर्गत उत्पादन घेतलेल्या तेलावर कमी करण्यात आला आहे. या नव्या निर्णयानंतर देशात तेलावर विंडफॉल टॅक्स घटून ४९०० रुपये प्रति टन झाली आहे. यासह डिझेल एक्सपोर्ट्सवर हे घटून ६.५ रुपये प्रति लिटरवर आले आहे. टॅक्समधील हे बदल २ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
विमान प्रवासही स्वस्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. एव्हीएशन टर्बाइनच्या किंमती २.३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवासही स्वस्त होणार आहे.