Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प

२०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प

विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:39 AM2023-11-29T09:39:15+5:302023-11-29T09:39:29+5:30

विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे. 

Wings of 200 planes jammed, air travel will be expensive! Inmin 790 planes, some engines stopped | २०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प

२०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प

मुंबई - विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे. 
भारतीय विमान क्षेत्रातील विविध कंपन्यांची मिळून एकूण ७९० विमाने आहेत. यापैकी इंजिनमधील बिघाड व अन्य तांत्रिक कारणांमुळे १६० विमाने यापूर्वीच जमिनीवर आहेत. यात आणखी भर पडल्यानंतर ५८८ च्या आसपास विमाने केवळ  प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत. 

१५ कोटी जण प्रवास करणे अपेक्षित
स्पाइस जेट व एअर इंडियाची प्रत्येकी ३० विमाने उड्डाणापासून बाहेर आहेत. त्यात इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. चालू वर्षाअखेरीस देशांतर्गत मार्गावर १५ कोटी जण विमान प्रवास तर ७ कोटी नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करणे अपेक्षित आहे.  विमानांची संख्या घटल्याने तिकिटांच्या किमती आगामी काळात वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title: Wings of 200 planes jammed, air travel will be expensive! Inmin 790 planes, some engines stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान