मुंबई - विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे. भारतीय विमान क्षेत्रातील विविध कंपन्यांची मिळून एकूण ७९० विमाने आहेत. यापैकी इंजिनमधील बिघाड व अन्य तांत्रिक कारणांमुळे १६० विमाने यापूर्वीच जमिनीवर आहेत. यात आणखी भर पडल्यानंतर ५८८ च्या आसपास विमाने केवळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत.
१५ कोटी जण प्रवास करणे अपेक्षितस्पाइस जेट व एअर इंडियाची प्रत्येकी ३० विमाने उड्डाणापासून बाहेर आहेत. त्यात इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. चालू वर्षाअखेरीस देशांतर्गत मार्गावर १५ कोटी जण विमान प्रवास तर ७ कोटी नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करणे अपेक्षित आहे. विमानांची संख्या घटल्याने तिकिटांच्या किमती आगामी काळात वाढण्याचा अंदाज आहे.