लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीच्या सुट्यांनिमित्त जर तुम्ही आता पर्यटनाचे नियोजन करत विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. विमान तिकिटाचे दर एकदा तपासा. देश व परदेशातील बहुतांश पर्यटन ठिकाणी जाणाऱ्या विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. या सर्वच मार्गांवरील तिकिटांच्या दरात सरासरी २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या सरत्या दहा महिन्यांत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
गो-फर्स्ट कंपनी मे महिन्यापासून बंद पडल्यामुळे त्या कंपनीची ५६ विमाने देशातील एकूण विमानांच्या संख्येतून बाद झाल्यामुळे उपलब्ध मर्यादित विमानांवरच ताण आहे. विमानांची मर्यादित उपलब्धता आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे विमान तिकिटांचे दर या वर्षभरात सिझन नसूनही चढेच राहिले आहेत.
आता दिवाळीच्या सुट्या, पाठोपाठ नाताळच्या सुट्या यामुळे अनेकांनी पर्यटनाची योजना आखली आहे. मात्र, विमान प्रवासाचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेकांना आपल्या प्रवास योजनेचा पुनर्विचार करावा लागणार आहे.
मुंबई ते चंडीगड
मुंबई ते श्रीनगर
मुंबई ते कोलकाता
मुंबई ते दिल्ली
मुंबई ते बंगळुरू
मुंबई ते कोची
मुंबई ते चेन्नई
मुंबई ते गोवा