Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी विप्रो आता पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 01:20 PM2023-04-21T13:20:30+5:302023-04-21T13:21:36+5:30

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी विप्रो आता पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी केली आहे.

wipro consumer care announces acquisition of kerala based food brand brahmins details here | अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी विप्रो आता पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी केली आहे. अदानी-अंबानी आणि टाटा यांना थेट स्पर्धा देण्यासाठी विप्रोने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने केरळच्या पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मन्सचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसांत या मार्केटमध्ये प्राइस वॉर पाहायला मिळू शकते. ही डील किती प्रमाणात पूर्ण झाली, याचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र हा सर्व रोखीचा करार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Rice : जगभर भात महागणार,भारत तारणार, जगभरात यंदा तांदळाची अभूतपूर्व टंचाई, देशात मात्र भरघाेस उत्पादन

अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ५ लाख कोटी रुपयांच्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपला पोर्टफोलिओ सतत वाढवत आहे. गुरुवारी विप्रो कंझ्युमर केअरच्या वतीने घोषणा करताना असे सांगण्यात आले की, त्यांनी ब्राहिम्सच्या(Brahmins) अधिग्रहणासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे. विप्रोने संपादनाची घोषणा करण्यापूर्वी २०२२ मध्ये गेल्या वर्षी निरापाराचे अधिग्रहण केले होते आणि भारताच्या पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये आपली भूमिका आणखी मजबूत केली होती.

विप्रो कंझ्युमर केअर, साबण, टाल्क, संतूर आणि यार्डले सारख्या वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छता उत्पादनांच्या निर्मिती करतात. पॅकेज्ड फूड क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी बनण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. मात्र, या क्षेत्रातील आधीच प्रबळ असलेल्या अदानी विल्मार, रिलायन्स रिटेल आणि टाटा कंझ्युमर लिमिटेड यांच्याशी थेट स्पर्धा करावी लागणार आहे. विप्रोने जो Brahmins ब्रँड विकत घेण्याची घोषणा केली आहे ती केरळमधील जुन्या आणि दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. हा ब्रँड पारंपारिक शाकाहारी, मसाल्यांचे मिश्रण आणि केरळची तयार उत्पादने तयार करतात.

Brahmins  कंपनीची सुरुवात १९८७ मध्ये झाली. हे नाश्ता प्री-मिक्स, मसाला, लोणचे, गोड मिक्स, गव्हाचे पदार्थ यांच्याशी संबंधित आहे. त्याच्या उत्पादनांना केवळ भारतातच नाही, तर अमेरिका, ब्रिटनसह जगातील इतर देशांमध्येही मोठी मागणी आहे. दक्षिणेकडील बाजारपेठेत Brahmins  त्याच्या विभागात पहिल्या क्रमांकावर आहेत. भारताशिवाय अमेरिका, ब्रिटन आदी देशांमध्ये त्याची उत्पादने विकली जातात.

आयटी क्षेत्रातील दिग्गज विप्रोचे हे १४ वे अधिग्रहण आहे. या संदर्भात, विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगचे सीईओ आणि विप्रो एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्हणाले की, कंपनीने नीरापाराचे पहिले संपादन करून अन्न क्षेत्रात प्रवेश केला आणि सहा महिन्यांत Brahmins चे अधिग्रहण केले. आमच्या मागील संपादनाप्रमाणेच हे यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे. केरळमधील हा एक मजबूत ब्रँड आहे, जो मसाले आणि तयार-कुक विभागांमध्ये अग्रेसर आहे.

Web Title: wipro consumer care announces acquisition of kerala based food brand brahmins details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.