नवी दिल्ली- बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सेबी(सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आता विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांची मदत घेणार आहे. सेबी विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांच्या मदतीनं बाजारावर नजर ठेवणार आहे.तर इतर कंपन्यांमध्ये एसेंचर सोल्युशन, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेज इंडिया, हेलवेट पेकार्ड एंटरप्रायजेस(इंडिया), ईआईटी सर्व्हिसेज इंडिया आणि तरावू टेक्नॉलाजीचा समावेश आहे. सेबीची या कंपन्यांच्या मदतीनं डेटा स्टोरेज क्लाऊड, ब्रोकर्सवर नजर ठेवून आकलन करणे, विश्लेषण क्षमतेचा विस्तार करण्याची इच्छा आहे. या कंपन्यांमुळे सेबीला डाटा मायनिंग (माहिती हुडकून काढणे), हेरगिरीची साधने विकसित करण्यासह सायबर हल्ले रोखण्यास मदत मिळणार आहे.तसेच नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिग्रहण सौद्यात छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सेबीने या कंपन्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. तसेच नवीन प्रवर्तकांमार्फत छोट्या गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या मूल्यांबाबत स्वतंत्रपणे आकलन केले जाणार आहे.
विप्रो, एल अँड टीसह इतर सात कंपन्यांद्वारे सेबी ठेवणार बाजारावर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 5:54 PM