Wipro founder Azim Premji News: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांची दोन मुलं रिशद आणि तारिक यांना जवळपास ४९० कोटी रुपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. विप्रोनंशेअर बाजाराला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. विप्रोच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, ५१,१५,०९० इक्विटी शेअर्स अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांना दिले होते. त्याचप्रमाणे विप्रो एंटरप्रायझेसचे बिगर कार्यकारी संचालक तारिक प्रेमजी यांनाही ५१,१५,०९० इक्विटी शेअर्स भेट देण्यात आले आहेत. याचा अर्थ अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या दोन मुलांना एकूण १,०२,३०,१८० शेअर्स गिफ्ट केलेत.शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती विप्रोनं डिसेंबर २०२३ मध्ये शेअरहोल्डिंग पॅटर्न अपडेट केला होता. त्यानुसार प्रवर्तकांकडे ७२.९० टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, पब्लिक शेअरहोल्डिंग २६.९७ टक्के आहे. याशिवाय ०.१३ टक्के हिस्सा इतरांकडे आहे. डिसेंबरपर्यंत प्रवर्तक गटातील चार लोकांकडे ४.४३ टक्के हिस्सा होता. अझीम प्रेमजींकडे किती शेअर्स?अझीम प्रेमजी यांच्याकडे सर्वाधिक ४.३२ टक्के शेअर्स होते, जे २२,५८,०८,५३७ शेअर्स इतके आहे. तर, रिशाद आणि तारिक प्रेमजी यांचा अनुक्रमे ०.०३ टक्के हिस्सा होती. अझीम प्रेमजी यांची पत्नी यास्मिन यांच्याकडे ०.०५ टक्के हिस्सा आहे. याशिवाय अझीम प्रेमजींचे वेगवेगळे ट्रस्ट किंवा फाउंडेशन ६८.४७ टक्के भागधारक आहेत. शेअर ट्रान्झॅक्शनसोबत अझीम प्रेमजी यांचा कंपनीत ४.१२ टक्के हिस्सा असेल. विप्रोचे शेअर्सशेअर बुधवारी ४७८ रुपयांवर बंद झाला. या किमतीत, अझीम प्रेमजींनी त्यांच्या दोन्ही मुलांना भेट दिलेल्या १,०२,३०,१८० (एक कोटीहून अधिक) शेअर्सचे एकूण मूल्य ४८९ कोटी रुपये आहे. दरम्यान, गुरुवारी कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स घसरले आणि ते ४७५ रुपयांच्या खाली ट्रेड करत होते. या वर्षी १५ जानेवारी रोजी शेअरची किंमत ५२६.४५ रुपयांवर पोहोचली. हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता.
Wipro News : विप्रोच्या अझीम प्रेमजींनी आपल्या मुलांना भेट म्हणून दिले १ कोटी शेअर्स, पाहा किती आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:52 PM