Join us

Wipro: गुड न्यूज! एका वर्षात विप्रोची दुसऱ्यांदा पगारवाढ; ८० टक्के कर्मचाऱ्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:10 PM

Wipro: विप्रो कंपनीकडून वर्षभरात दुसऱ्यांना कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: एकीकडे कोरोना संकटाच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले असून, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर, दुसरीकडे विप्रो कंपनीकडून वर्षभरात दुसऱ्यांना कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कंपनीकडून पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्‍यांना होईल, असे सांगितले जात आहे. (wipro second time this year plan to hike salary for 80 percent of eligible staff)

विप्रो कंपनीकडून देण्यात येणारी पगारवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होईल. २०२१ मध्ये विप्रोने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला आहे. कंपनीची ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्‍यांना लागू असेल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Adani Group ला मोठा फटका; ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान!

जूनपासून वाढीव वेतन मिळणार

पात्र कर्मचार्‍यांना जूनपासून वाढीव वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे. व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. देशात स्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ उच्च एकेरी अंकात, तर ऑनसाइट कर्मचार्‍यांना मिड-सिंगल डिजिटमध्ये तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना जास्त पगारवाढ दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य!

आम्ही कौशल्य आधारित बोनस देणार आहोत

आम्ही कौशल्य आधारित बोनस देणार आहोत, असे विप्रोच्या सौरभ गोविल यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल विप्रोने जाहीर केले. चौथ्या तिमाहीत कर्मचारी कमी करण्याचा विप्रो कंपनीतील दर १२.१ टक्के होता, असे कंपनीने सांगितले आहे. २०२१ आर्थिक वर्षात कंपनीने कॅम्पसमधून १० हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

दरम्यान, वर्षभरात दुसऱ्यांदा पगारवाढ करणारी विप्रो दुसरी कंपनी आहे. यापूर्वी टीसीएसने गेल्या वर्षी दोनवेळा पगारवाढ केली होती. टीसीएसने ६ महिन्यांच्या अंतराने पगार वाढविला होता. टीसीएस कर्मचार्‍यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४ टक्के वाढ झाली आहे. 

टॅग्स :विप्रोव्यवसाय