Join us

iPhone बनवण्यासाठी TATA समूहाला किती पैसे खर्च करावे लागणार? पाहा संपूर्ण हिशोब...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 4:42 PM

Wistron India: भारतात आयफोन बनवण्यासाठी अॅपलने विस्ट्रॉनचे इंडिया युन‍िट खरेदी केले आहे.

Tata wistron Deal: देशातील दिग्गज उद्योग समूहांपैकी एक असलेला टाटा समूह भारतात Apple iPhne बनवणार आहे. यासाठी टाटानेअॅपलचा मोठा पुरवठादार असलेली विस्ट्रॉन कंपनी खरेदी केली आहे. सूमारे 750 मिलियन डॉलर्स (सुमारे 6700 कोटी) मध्ये हा करार निश्चित झाला आहे. विस्ट्रॉनच्या अधिग्रहणानंतर टाटा समूह आयफोन असेंबल करणारी पहिली भारतीय कंपनी बनेल. 

कंपनीवर 75-80 मिलियन डॉलर्सचे कर्जबुधवारी दोन्ही पक्षांनी अधिग्रहण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 27 ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या माहितीमध्ये 125 मिलियन डॉलर्स (सुमारे 1000 कोटी रुपये) देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पण हा फक्त इक्विटी चेक आहे. याशिवाय, कंपनीवर 75-80 मिलियन डॉलर्सचे कर्ज आहे, जे टेकओव्हर कंपनीला भरावे लागेल. याशिवाय, मूळ कंपनीने विस्ट्रॉन इंडियाला $550 मिलियन इंटर-कॉर्पोरेट कर्ज दिले आहे.

2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TIPL) द्वारे विस्ट्रॉनच्या युनिटचे अधिग्रहण केले जात आहे. तामिळनाडूतील होसूर येथे त्यांचा उत्पादन कारखाना आहे. TEPL ही देशातील Apple पुरवठादारांपैकी एक आहे. तैवान स्थित कंपनी विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्यावेळी कंपनीकडून अनेक डिव्हाइसची रिपेअर फॅसिलिटी दिली जायची.

2017 मध्ये विस्ट्रॉनने ऑपरेशन्सचा विस्तार केला आणि Apple साठी iPhones चे उत्पादन सुरू केले. विस्ट्रॉनच्या या प्लांटमध्ये 14000 ते 15000 कर्मचारी काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऍपलच्या अटींनुसार नफा मिळविण्याच्या आव्हानामुळे कंपनीला आपला भारतीय असेंबली कारखाना विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता हा कारखाना टाटाने मिळवला आहे.

टॅग्स :टाटाअॅपलभारतव्यवसाय