Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त

दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारं शुल्क कमी करण्याच्या विचाराधीन आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:02 PM2019-07-30T12:02:49+5:302019-07-30T12:15:51+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारं शुल्क कमी करण्याच्या विचाराधीन आहे.

Withdrawal from another bank ATM will now be cheaper | दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त

दुसऱ्या बँक ATMमधून पैसे काढणं आता होणार आणखी स्वस्त

नवी दिल्लीः ऑनलाइन पैसे हस्तांतरित करण्यासाठी लागणारं एनईएफटी आणि आरटीजीएसचं शुल्क संपवल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारं शुल्क कमी करण्याच्या विचाराधीन आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याची घोषणा पुढील महिन्यात होऊ शकते. इतर बँकांच्या एटीएम वापरल्यास त्यावरचं पूर्ण शुल्क माफ करता येणार नसल्याचं आरबीआयनं आधीच स्पष्ट केलं आहे. सद्यस्थिती इतर बँकांच्या एटीएमद्वारे तीन वेळा व्यवहार केल्यास ते मोफत असते. परंतु त्याहून अधिक वेळा पैसे काढल्यास ठरावीक शुल्क आकारले जाते.

खासगी बँका सध्या शहरांमध्ये महिनाभरात सुरुवातीच्या तीन वेळा एटीएममधून पैसे काढल्यावर शुल्क आकारत नाहीत. तर इतर शहरांमध्ये एटीएममधून पाच वेळा अशा प्रकारे मोफत पैसे काढता येतात. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते. एटीएम शुल्क वसूल करण्यासंबंधीचा आढावा घेण्यात येत असून, त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीनंही यासंबंधीचा अहवाल तयार केला आहे. त्यात हे शुल्क कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकरच आरबीआयकडे सुपूर्त केला जाण्याची शक्यता आहे. एटीएम शुल्क आकारणे पूर्णपणे बंद करण्यात आले नसून, शुल्क कमी करण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: Withdrawal from another bank ATM will now be cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम