Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar Card: 'आधार कार्ड' नाही तर सबसिडी नाही! मंत्रालय आणि राज्यांसाठी सर्क्युलर जारी; काय आहेत आदेश वाचा...

Aadhaar Card: 'आधार कार्ड' नाही तर सबसिडी नाही! मंत्रालय आणि राज्यांसाठी सर्क्युलर जारी; काय आहेत आदेश वाचा...

Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:03 PM2022-08-16T14:03:10+5:302022-08-16T14:06:54+5:30

Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.

without aadhar card or enrolment slip you will not get govt subsidies here is all information | Aadhaar Card: 'आधार कार्ड' नाही तर सबसिडी नाही! मंत्रालय आणि राज्यांसाठी सर्क्युलर जारी; काय आहेत आदेश वाचा...

Aadhaar Card: 'आधार कार्ड' नाही तर सबसिडी नाही! मंत्रालय आणि राज्यांसाठी सर्क्युलर जारी; काय आहेत आदेश वाचा...

Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार UIDAI नं स्पष्ट केलं आहे की सरकारी योजना आणि सबसिडीचे लाभ मिळवण्यासाठी आधार अनिवार्य आहे. यासाठी प्राधिकरणानं सर्व मंत्रालयं आणि राज्य सरकारांना परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकात राज्य सरकारं आणि मंत्रालयांना केवळ आधार कार्ड असलेल्या नागरिकांनाच योजना आणि सबसिडीचा लाभ मिळावा, असं सांगण्यात आलं आहे.

आधार नियम झाले आणखी कठोर
रिपोर्टनुसार आता आधारचे नियम अधिक कडक केले जाणार आहेत. आधारसाठी सध्याच्या सूचनांनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल, तर तो इतर कागदपत्रे दाखवून अनुदानाचा लाभ घेऊ शकतो. मात्र, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल, तर त्यानं त्यासाठी अर्ज करावा आणि अर्जाच्या बदल्यात मिळालेली पावती किंवा नावनोंदणी स्लिप दाखवूनच अनुदान किंवा सरकारी योजनेच्या लाभासाठी दावा करावा, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच आता सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पावती असणं आवश्यक आहे. जर एखाद्याकडे आधार नसेल किंवा त्याने आधारसाठी अर्ज केला नसेल तर त्याला इतर कागदपत्रे दाखवून सरकारी सूट आता मिळू शकणार नाही.

नियम सक्तीचं कारण काय?
सबसिडी आणि सूट मध्ये हेराफेरी आणि गळती रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ही गळती रोखण्यासाठीच आधार कार्ड सुरू करण्यात आले. आता अशा तरतुदी कडक केल्या जात आहेत, ज्याचा फायदा लोक घेऊ शकतात. नवीन परिपत्रक हे सुनिश्चित करेल की सबसिडीचा लाभ फक्त अशा लोकांनाच पोहोचेल जे आधारशी लिंक आहेत किंवा जोडण्याच्या प्रक्रियेत आहेत. सध्या सरकार स्वस्त दरात राशन ते कमी दरात कर्ज अशा अनेक योजना चालवत आहे, ज्यांचे वितरण 'आधार'च्या सहाय्यानं केलं जात आहे.

Web Title: without aadhar card or enrolment slip you will not get govt subsidies here is all information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.