ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.20- तुमच्यासोबत काम करणा-या महिला सहयोगी त्यांचा मोबाइल सारखा बदलतात का? किंवा इतर पुरूषांच्या तुलनेत त्यांचा मोबाइल लवकर खराब होतो का?. खरंतर यामागे एक मनोरंजक तथ्य आहे. महिला पुरूषांच्या तुलनेत आपला फोन जास्त वेळेस पाडतात. एका सर्वेक्षणानुसार, पडून खराब झालेल्या मोबाइल फोनमध्ये 58 टक्के फोन हे महिलांचे आहेत.
एका सर्वेक्षणानुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तिंच्या स्मार्टफोनची स्क्रीन ही फोन खरेदी केल्याच्या 8 महिन्यातच तुटते. सर्वेक्षणात गेल्या वर्षात दुरूस्तीसाठी आलेल्या 4000 पेक्षा जास्त स्मार्टफोन खराब होण्याचं विश्लेषण करण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण इलेक्ट्रॉनिक्स सुरक्षा कंपनी 'आनसाइटगो'ने केलं आहे.