वॉशिंग्टन : भारतात महिला उद्योजकांच्या वाढत्या संख्येने उत्साहात असलेल्या निती आयोगाने त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एक विशेष विभाग पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
निती आयोगाच्या सदस्य अॅना रॉय यांनी सांगितले की, भारतातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रांत आता महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणत आहेत.
सुमारे दोन डझन महिला उद्योजकांचे एक शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या व्यावसायिक दौºयावर आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हैदराबादेत जागतिक उद्योजकता शिखर परिषद झाली होती. भारत व अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या परिषदेला अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प उपस्थित होती. भारतीय उद्योजक महिलांना अमेरिका दौरा घडवून आणण्याचा निर्णय तेव्हा झाला होता. त्यानुसार हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
रॉय यांनी सांगितले की, महिलांना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टींची गरज आहे. जागृती करणे, सध्याचे उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, विविध विभागांचा मेळ घालणे, भागीदारी संबंध निर्माण करणे, एकत्रीकरण करणे यांचा त्यात समावेश आहे. महिला उद्योजक विभाग ही सारी कामे करेल.
शिष्टमंडळाच्या अनेकांशी भेटी
अमेरिकेत आलेले भारतीय महिला उद्योजकांचे शिष्टमंडळ बोस्टन, पिट्सबर्ग आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे. वॉशिंग्टन दौºयात शिष्टमंडळाने अमेरिकेच्या परराष्टÑ विभागाच्या तसेच विदेशी खासगी गुंतवणूक महामंडळाच्या अधिकाºयांची भेट घेतली. यूएस चेम्बर आॅफ कॉमर्सच्या सदस्यांशीही त्यांनी बातचीत केली.
निती आयोग सुरू करणार महिला उद्योजक विभाग
भारतात महिला उद्योजकांच्या वाढत्या संख्येने उत्साहात असलेल्या निती आयोगाने त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:41 AM2018-02-23T05:41:20+5:302018-02-23T05:41:25+5:30