Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांचे अधिकार आणि कर सवलती

महिलांचे अधिकार आणि कर सवलती

अर्जुन : लहान मुलींशी संबंधित आयकरात काय फायदे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:21 AM2021-03-08T02:21:01+5:302021-03-08T02:21:25+5:30

अर्जुन : लहान मुलींशी संबंधित आयकरात काय फायदे आहेत?

Women's rights and tax breaks | महिलांचे अधिकार आणि कर सवलती

महिलांचे अधिकार आणि कर सवलती

अर्जुन : कृष्णा, या जागतिक महिलादिनी नवीन काय आहे?
कृष्ण : अर्जुना, ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २०२१ च्या महिला दिनाची मध्यवर्ती कल्पना आहे :  महिलांचे नेतृत्व : कोविड-१९च्या जगात समान भविष्य ! भारतात फक्त १९.९ टक्के महिला नोकरी-व्यवसाय करतात, हे प्रमाण चिंताजनक आहे.  

अर्जुन : लहान मुलींशी संबंधित आयकरात काय फायदे आहेत?
कृष्ण : सुकन्या समृद्धी ही सरकारी बचत योजना आहे.  लहान मुलींच्या पालकांना त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणासाठी आणि अन्य खर्चांसाठी बचत करता येईल. यातील गंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत आयकरात वजावट मिळते. तसेच व्याजावरसुद्धा आयकर लागत नाही. जास्तीत जास्त १० वर्ष वयाच्या लहान मुलीसाठी हे खाते चालू करता येते,मुलींचे फक्त जैविक पालक किंवा कायदेशीर पालकच त्यांच्या वतीने खाते चालू करू शकतात. एक पालक  त्यांच्या लहान मुलींसाठी दोन खाती चालू करू शकतात. जर जुळे किंवा तिळे असतील तर पालक तीन खाती चालू करू शकतात.

अर्जुन :  विवाहित महिलांना आयकरामध्ये कोणते अधिकार आणि  फायदे  आहेत?
कृष्ण :  हिंदू महिलांना आता त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार मिळतात. मुलींनासुद्धा हिंदू वांशिक संपत्तीमध्ये मुलांप्रमाणेच अधिकार असतील. महिलांना  नवऱ्याच्या संपत्तीमध्ये समान अधिकार असेल. हिंदू कायद्यानुसार एका महिलेला जे  दागिने इत्यादी भेटवस्तू मिळतात, ते स्त्रीधन असते. स्त्रीधनामध्ये सगळ्या स्थिर, अस्थिर संपत्ती, ज्या तीला तिच्या लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळी, जन्माच्या वेळी आणि विधवा झाल्यानंतर मिळाल्या असतील, त्या संपत्तीवर फक्त तिचाच अधिकार असेल.  विवाहित महिलांसाठी सोने ठेवण्याची मर्यादा ५०० ग्रॅम, तर अविवाहित महिलांसाठी २५० ग्रॅम आहे. आयकराच्या धाडीत ते जप्त केले जाऊ शकत नाही.  महिलांसाठी खास अधिक फायद्याच्या आरोग्य विमा योजना आहेत. महिलांना रोजगार दिल्यास मालकास ३० टक्के अतिरिक्त वजावट मिळते. 

अर्जुन :  महिलांसाठी इतर वित्तीय फायदे काय आहेत?
कृष्ण :   महिलांना १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.

Web Title: Women's rights and tax breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.