नवी दिल्ली : जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवसांत तुम्ही उबदार कपड्यांचा व्यवसाय म्हणजेच लोकरी कापड व्यवसाय (Woolen Cloth Business) सुरू करून चांगली कमाई करू शकता. कारण, सध्या थंडीचा हंगाम (Winter Season) सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही फक्त 2-3 महिन्यातच मोठी कमाई करू शकता. थंडीच्या हंगामात जॅकेट, स्वेटर, शाल अशा सर्वच उत्पादनांची मागणी वाढते.
जर तुम्हाला किरकोळ विक्री करायची नसेल तर घाऊक विक्रीतही व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. आगामी काळात उबदार कपड्यांची मागणी आणखी वाढेल, असे बाजारातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे तुमच्या दुकानातील लोकांच्या गरजेनुसार कपडे निवडा जेणेकरुन विक्रीत कोणताही अडथळा येणार नाही. थंडीच्या हंगामात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरतात.
याचबरोबर, प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या फॅशननुसार हिवाळ्यातील नवनवीन पोशाखही बाजारात येतात. उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे अधिक विविधता असणे आवश्यक आहे. जितकी विविधता जास्त तितके लोक कपडे खरेदी करतात. अशा परिस्थितीत उबदार कपड्यांच्या व्यवसायातून हिवाळ्यात लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हिवाळ्यातील कपडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकू शकता.
इतकी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकता
जर तुम्ही हे काम थोड्या प्रमाणात सुरू केले तर तुम्ही तुमचा व्यवसाय फक्त 2 ते 3 लाखांत सुरू करू शकता. तसेच, थोडे मोठ्या प्रमाणात काम सुरू करायचे असेल तर 5 ते 7 लाख रुपये लागतील. जर तुम्हाला उबदार कपडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ते पंजाब, हरियाणा, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणांहून ऑर्डर करू शकता. ही सर्व राज्ये लोकरीच्या कपड्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. तसे, तुमच्याच शहरात उबदार कपड्यांचे घाऊक विक्रेते मिळतील.
या गोष्टीची काळजी घ्या...
जिथे तुम्ही गोदाम उघडत आहात, ती जागा कोरडी असावी. लक्षात ठेवा की ओलसर जागा तुमच्या लोकरी आणि उबदार कपड्यांसाठी नुकसानदायक आहे. ओलाव्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये बुरशी येते. त्यामुळे त्यांचे नुकसान होण्याची भीती अधिक आहे. या व्यवसायातील नफा तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतो. याशिवाय, हंगाम हा तुमच्या कमाईचा सर्वात मोठा आधार आहे. सरासरी नफ्याबद्दल बोलायचे तर साधारणपणे 30 ते 40 टक्के नफा मिळू शकतो.