अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा सामना होणार असून फायनलची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी अहमदाबादला जाणारी विमानं आणि तिथल्या हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतीय संघानं उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत भारताला विश्वचषक जिंकताना पाहण्यासाठी चाहते मोठी किंमत मोजण्यास तयार आहेत.
अहमदाबादला जाणाऱ्या विमानाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तर हॉटेलची रुम घेणंही बजेटच्या बाहेर गेलं आहे. हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचा खर्च २४,००० रुपयांवरून २,१५,००० रुपयांपर्यंत वाढला आहे. अंतिम सामन्याला अवघे काही दिवस बाकी असताना, साध्या हॉटेलच्या रूमची किंमत १० हजार रुपयापर्यंत पोहोचली आहे. जर तुम्हाला ३ स्टार आणि ५ स्टार हॉटेल्स सारख्या चांगल्या हॉटेल्समध्ये राहायचं असेल तर एक लाखांपर्यंत भाडं देण्याची तयारी ठेवावी लागेल. अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठीही असंच बुकिंग पाहायला मिळालं होतं.
सर्च हिस्ट्रीमध्ये सर्वात वर अहमदाबाद
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद पुन्हा एकदा सर्चमध्ये टॉपवर आहे. गुगल फ्लाइट डेटानुसार, तुम्ही अंतिम सामन्याच्या आठवड्यात काही महिने आधीच तिकीट बुक करत असता तरीही, तुम्हाला २००-३०० टक्के जास्त पैसे द्यावे लागले असते. १८ नोव्हेंबर रोजी दिल्ली ते अहमदाबाद तिकीटाची किंमत १५ हजार रुपये झाली आहे. अंतिम सामन्यासाठी १३ नोव्हेंबरला तिकिटं लाईव्ह झाली होती. आता संपूर्ण तिकिटांची विक्री झाली आहे. BookMyShow वर सर्वात स्वस्त तिकीट १० हजार रुपयांना विकलं गेलं.
WC 2023: अहमदाबादमध्ये एका दिवसाचं भाडं ₹२ लाखांवर, विमानाच्या तिकिटांचे दरही गगनाला भिडले
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:16 AM2023-11-17T09:16:26+5:302023-11-17T09:17:19+5:30