Working Hours: काही दिवसांपूर्वीच देशातील आघाडीची IT कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती(Narayana Murthy) यांनी देशातील तरुणांनी 12-12 तास काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन गट पडले, एका गटाने या वक्तव्याचे समर्थन केले तर दुसऱ्या गटाने विरोध केला. दरम्यान, OLA चे प्रमुख भावीश अग्रवाल (Bhavish Aggarawal) यांनीही या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
भाविश अग्रवाल यांनी या मुद्द्यावर एनआर नारायण मूर्तींचे समर्थन करणारे ट्विट केले आहे. नारायण मूर्ती यांनी जे सांगितले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Putting in the hours 😉. Not just 70, more like 140! 😀😎
— Bhavish Aggarwal (@bhash) October 28, 2023
Only fun, no weekends! pic.twitter.com/LiuyJ4KELb
भाविश अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'कामात अनेक तास घालवा. फक्त 70 तास नाही तर 140 तासांपेक्षा जास्त काम करा. ओनली फन, नो वीकेंड...' यापूर्वी त्यांनी आणखी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी आपले मत मांडले होते. ते म्हणाले, 'ही वेळ कमी काम करण्याची आणि मजा करण्याची नाही. इतर देशांनी अनेक पिढ्यांसाठी जे केले, ते आपणही करण्याची वेळ आहे.'
संबधित बातमी- नारायण मूर्तींच्या वक्तव्याचे सज्जन जिंदालांकडून समर्थन; म्हणाले- 'तरुणांनी रोज 12 तास काम करावे...'
काय म्हणाले होते नारायण मूर्ती?
नारायण मूर्ती म्हणाले होते की, आपल्याला विकसित देशांशी स्पर्धा करायची असेल, तर तरुणांना अतिरिक्त तास काम करावे लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने असेच काहीसे केले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठीही सरकारला महत्त्वाची पावले उचलावी लागतील. प्रगतीशील देशांशी स्पर्धा करायची असेल तर नोकरशाही सुधारावी लागेल. देशातील सर्व तरुणांना हे लक्षात घेऊन पुढील 20-50 वर्षे दिवसाचे 12 तास काम करावे, जेणेकरून भारत जीडीपीच्या बाबतीत नंबर 1 किंवा 2 होईल. सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, देशातील जनतेलाही पुढे येऊन योगदान द्यावे लागेल, असे ते म्हणाले होते.