नवी दिल्ली – जर तुम्ही Annual Goals लवकर पूर्ण केले तर तुम्हाला उर्वरित दिवसांमध्ये ४ डे वीकचा आनंद घेऊ शकता. ही नवी हायपर पर्सनलाइज्ड पॉलिसी रँडस्टँड इंडियाने त्यांच्या कंपनीत लागू केली आहे. या पॉलिसीचा उद्देश कंपनीतील कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचे टार्गेट पूर्ण करावे यासाठी ऑफर देण्यात आली आहे. टार्गेट पूर्ण करून कंपनीतील कर्मचारी त्यांचे आयुष्यही मस्त जगू शकतील यासाठी ३ दिवस वीक ऑफ देण्याचे ठरवले आहे.
४ डे शेड्युल्ड अंतर्गत कर्मचारी पारंपारिक ५ किंवा ६ दिवसांऐवजी आठवड्याला ४ दिवस काम करतील. पण वर्कलोड समान राहील. रँडस्टँड इंडियाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अंजली रघुवंशी म्हणाल्या की, VUCA वर्ल्डमध्ये लवकरच वेगाने बदल घडत आहेत. कंपनीला त्यांच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्हिजन आणि क्लिअरिटीने पुढे जाणे गरजेचे आहे. आज दिशादर्शक आणि ध्येयपूर्तीने कामाकडे लक्ष देण्यासाठी हायपर पर्सनलाइज्ड एप्रोचसाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत रँडस्टॅँडने ही पॉलिसी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणली आहे. ४ डे वीक पॉलिसीने कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होईल. कामाच्या ठिकाणांमध्ये लवचिकता आणि आवश्यक गरजा लक्षात घेऊन ४ डे वीकची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये वाढत आहे. रँडस्टँड कर्मचाऱ्यांनी केलेल्या एका सर्व्हेत ८३ टक्के कर्मचाऱ्यांनी ४ डे वीकमध्ये जाण्यास रस दाखवला. त्यातील बहुतांश उत्पादक वाढी आणि कामावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे फायदेशीर ठरेल असं म्हटलं आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना ४ डे वीकची सुविधा देणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये Beroe चा समावेश आहे. ही एक ग्लोबल बेस्ड इंटेलिजेंस आणि एनालॅटिक्स कंपनी आहे. या कंपनीने ऑगस्ट २०१७ पासून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ डे वीक लागू केला आहे. कंपनीच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना ही पॉलिसी लागू केली आहे.