Lokmat Money > बिझनेस न्यूज > Work From Home मध्ये तणावही कमी, कार्यक्षमताही वाढली; प्रत्येक शिफ्टमध्येही झालंय अधिक काम

Work From Home मध्ये तणावही कमी, कार्यक्षमताही वाढली; प्रत्येक शिफ्टमध्येही झालंय अधिक काम

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली, सर्वेक्षणातून माहिती आली समोर.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:38 AM2022-04-26T11:38:31+5:302022-04-26T11:39:03+5:30

कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली, सर्वेक्षणातून माहिती आली समोर.

Work From Home also reduces stress and increases efficiency More work has been done in each shift owl labs study | Work From Home मध्ये तणावही कमी, कार्यक्षमताही वाढली; प्रत्येक शिफ्टमध्येही झालंय अधिक काम

Work From Home मध्ये तणावही कमी, कार्यक्षमताही वाढली; प्रत्येक शिफ्टमध्येही झालंय अधिक काम

दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना महासाथीनं हाहाकार माजवला होता. अनेक गोष्टी ठप्पही झाल्या. अनेकांचं कामकाजही ठप्प झालं होतं. परंतु कालांतरानं कोरोनाच्या महासाथीत वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान, याचे काही सकारात्मक परिणामही समोर आले आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आलीये. वर्क फ्रॉम होममुळे ना केवळ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली आहे, तर याशिवाय त्यांची प्रोडक्टिव्हीटीही वाढली आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर असलेला तणावही कमी झाल्याचं दिसून आलंय.

आउल लॅब्सनं (Owl Labs) केलेल्या अनेक सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा घरून काम करताना उत्पादकता चांगली होती. याशिवाय जे कर्मचारी घरून काम करतात ते आठवड्याचा एक दिवस अधिक काम करत असल्याचंही सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. स्टॅनफोर्डद्वारे ९ महिन्यांमध्ये १६ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत १३ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलंय. घरातील शांततापूर्ण वातावरण कमी तणाव यामुळे ही वाढ झाल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय. प्रत्येक शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यानं अधिक वेळ काम केलं आणि कामाप्रती कर्मचाऱ्यांमध्ये आवडही दिसून आल्याचं यात सांगण्यात आलंय.

ऑफिस मीटिंगमुळे तणाव
ऑफिसमध्ये काम करून मीटिंगमध्ये सहभागी होण्यात मानसिक दडपण असतं अशी प्रतिक्रिया ७० टक्के लोकांनी सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली. दररोज मीटिंगमध्ये उपस्थित असणं हे एक नवीन आव्हान आहे. तणावाचा कामाच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो, असंही सर्वेक्षणातून समोर आलंय. Owl Labs च्या सर्वेक्षणात असे आढळून आलं. याशिवाय ६४ टक्के लोकांना हायब्रिट मीटिंग आवडत असल्याचंही आउल लॅब्सनं सर्वेक्षणात नमूद केलंय.

Web Title: Work From Home also reduces stress and increases efficiency More work has been done in each shift owl labs study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.