Join us  

वर्क फ्रॉम होम संपले अन् सुरु झाले राजीनामा सत्र; दोन ठिकाणी काम करण्यामुळे कंपन्यांची अडचण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:57 AM

Work from home : हळूहळू अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलाविण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम संकल्पनेचा सर्वच कंपन्यांनी वापर केला. हळूहळू अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलाविण्यास सुरुवात केली. मात्र, वर्क फ्रॉम होम संपुष्टात आणणाऱ्या कंपन्यांना वेगळ्याच समस्येने त्रस्त केले आहे. कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी राजीनामा देत असल्याचे आढळले आहे.

'ऑन'तर्फे सर्वेक्षण : ७०० कंपन्यांचा समावेश>> ज्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद केले होते, तेथे कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण २९% आढळून आले.>> ज्या ठिकाणी हायब्रिड मॉडेल सुरु होते, तेथे हे प्रमाण केवळ १९ टक्के होते.>> ऑगस्टमध्ये केवळ ९ टक्के कंपन्यांनीच पूर्णपणे वर्क फ्रॉम होमला परवानगी दिली होती.

इन्फोसिसची परवानगीआयटी क्षेत्राला या समस्येने त्रस्त केले असले तरी 'इन्फोसिस ने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीतील नोकरीशिवाय दुसरे अस्थायी स्वरूपातील काम करण्यास सशर्त मंजुरी दिली आहे.

>> कर्मचाऱ्यांना दुसरे काम करायचे असेल मॅनेजरची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.>> हे काम कंपनी व ग्राहकांसोबत स्पर्धा करणारे किंवा हितांना हानी पोहोचविणारे कदापि नसावे.>> कर्मचारी कंत्राटी पद्धतीने ही कामे कशा पद्धतीने करू शकतात. याबाबत कंपनीने मार्गदर्शनही केले. 

टॅग्स :व्यवसाय