नवी दिल्ली : ‘वर्क फ्रॉम होम’ आता कमी झाले आहे. त्याचवेळी शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. नऊ महिन्यांत ॲक्टिव्ह क्लायंटची संख्या ५३ लाखांनी कमी झाली आहे.
वर्क फ्रॉम होमच्या काळात शेअर बाजारात किरकोळ व्यावसायिकांचा जो उत्साह होता, तो आता राहिलेला नाही. ३ प्रमुख संकेतांतून किरकोळ समभाग व्यावसायिकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. नकारात्मक रिटर्न मिळाल्यामुळे लोक बाजारापासून दूर होताहेत.
₹४९,२०० कोटी आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक एनएसईमध्ये. मध्ये एनएसईमधील गुंतवणूक अवघी रुपये राहिली. २०२१-२२ : ₹१.६५ लाख कोटी २०२०-२१ : ₹६८,४०० कोटी९ महिन्यांपासून सातत्याने सक्रिय ग्राहकांच्या संख्येत घटमार्च २३ : ३.२७ कोटी जून २२ : ३.८ कोटी वित्त वर्ष २०२३ : किरकोळ गुंतवणूकदारांनी मागील ३ वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी गुंतवणूक केली.