Join us

एचडीएफसी एर्गोचे काम लिन टेरॅक्टिव्हकडे

By admin | Published: February 25, 2017 12:42 AM

डिजिटल क्षेत्रातील कंपनी लिन टेरॅक्टिव्हला एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे काम मिळाले आहे. दुचाकी वाहनांच्या विम्याच्या क्षेत्रात कंपनी नवीन मार्ग चोखाळणार आहे.

मुंबई : डिजिटल क्षेत्रातील कंपनी लिन टेरॅक्टिव्हला एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे काम मिळाले आहे. दुचाकी वाहनांच्या विम्याच्या क्षेत्रात कंपनी नवीन मार्ग चोखाळणार आहे. एचडीएफसी एर्गोचा सर्व डिजिटल भाग लिन टेरॅक्टिव्ह विकसित करणार आहे. सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांच्या विम्यासाठी ही डिजिटल यंत्रणा वापरली जाणार आहे. एकदा विमा पॉलिसी घेतल्यानंतर वाहनधारक तिचे नूतनीकरण करीत नाहीत. त्यामुळे नूतनीकरण क्षेत्रात काहीच व्यवसाय होत नाही. यात बदल घडवून ग्राहकांना विम्याचे नूतनीकरण करण्यास प्रवृत्त करता येईल, अशी यंत्रणा कंपनी उभी करीत आहे.