Join us

‘वर्क फ्रॉम होम’च्या सुविधेमुळे विवाहित महिलांना मिळाले काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:18 AM

दिव्या कोहद (२७) या गेल्या वर्षी विवाहबद्ध झाल्या होत्या. त्यांचे पती जयपूर शहरातील असल्यामुळे त्यांना बंगळुरूतील आपली नोकरी सोडावी लागली. वर्क फ्रॉम होमची सुविधा झाल्यानंतर त्यांना एका इन्व्हेस्टमेंट बँकेत नोकरी मिळाली

ठळक मुद्देदिव्या कोहद (२७) या गेल्या वर्षी विवाहबद्ध झाल्या होत्या. त्यांचे पती जयपूर शहरातील असल्यामुळे त्यांना बंगळुरूतील आपली नोकरी सोडावी लागली. वर्क फ्रॉम होमची सुविधा झाल्यानंतर त्यांना एका इन्व्हेस्टमेंट बँकेत नोकरी मिळाली

मुंबई : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या ‘वर्क फ्राॅम होम’मुळे असंख्य महिलांना पुन्हा काम मिळण्यास मदत झाली, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. मुले आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकऱ्या सोडणाऱ्या असंख्य महिलांना याचा लाभ झाला, असे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.अवतार समूहाने हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात सहभागी ८६ टक्के विवाहित महिलांनी कोविडपश्चात रोजगाराची संधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. यातील बहुतांश महिला २५ ते ३५ या वयोगटातील आहेत.

दिव्या कोहद (२७) या गेल्या वर्षी विवाहबद्ध झाल्या होत्या. त्यांचे पती जयपूर शहरातील असल्यामुळे त्यांना बंगळुरूतील आपली नोकरी सोडावी लागली. वर्क फ्रॉम होमची सुविधा झाल्यानंतर त्यांना एका इन्व्हेस्टमेंट बँकेत नोकरी मिळाली. त्या आता घरूनच काम करतात. दिव्या यांनी सांगितले की, माझ्या सासरच्या लोकांनीही प्रोत्साहित केल्यामुळे मी पुन्हा कामावर परतू शकले. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, रोजगारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांत ४४ टक्के महिला करिअरच्या मध्यकालात आहेत. २० टक्के विवाहित महिलांनी आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेतलेला होता. अवतार समूहाच्या संस्थापक सौंदर्या राजेश यांनी सांगितले की, आदल्या वर्षात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांत एकट्या महिलांचे प्रमाण अधिक होते. महिला अनेक कारणांनी नोकरी सोडतात. 

लग्न, जोडीदाराचे स्थलांतर आणि  मुले ही त्यातील प्रमुख कारणे  आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ कार्य पद्धतीमुळे या जबाबदाऱ्या पार पाडून घरूनच काम करण्याची सोय झाल्यामुळे नोकरी सोडणाऱ्या महिला पुन्हा नोकऱ्या शोधत आहेत.

nमहिला अनेक कारणांनी नोकरी सोडतात. लग्न, जोडीदाराचे स्थलांतर आणि मुले ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ कार्य पद्धतीमुळे या घरूनच काम करण्याची सोय झाल्यामुळे नोकरी सोडणाऱ्या महिला पुन्हा नोकऱ्या शोधत आहेत.

टॅग्स :महिलाकोरोना वायरस बातम्या