- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.
प्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, यासंदर्भात टोल कंपन्यांशी चर्चा झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागांतील महिलांना रोजगाराची तसेच संगणकावर काम करण्याची संधी मिळू शकेल. टोल नाक्याबरोबर महामार्गांवरील फूड मॉल व करमणूक केंद्रे तसेच पे अँड यूज स्वच्छतागृहे येथेही महिलांना प्राधान्याने काम मिळावे, असा प्रयत्न आहे. सर्व महामार्गांवर टोलनाक्यांपाशी करमणुकीची केंदे्र सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
टोलवसुलीचे कामही आता महिलांना देणार
देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:36 AM2018-03-10T01:36:10+5:302018-03-10T01:36:10+5:30