नवी दिल्ली - भारतात रोजगारप्राप्त पुरुषांच्या संख्येत २०१७−१८ मध्ये घट झाली आहे. १९९३−९४ नंतर पहिल्यांदाच ही घट झाल्याचे दिसून आले आहे. एनएसएसओच्या क ालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणातील (पीएलएफ ) आक डेवारीतून ही माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे लोक सभा निवडणुक ांच्या पार्श्वभूमीवर हा सर्वेक्षण अहवालच सरक ारने दाबून ठेवला आहे.प्राप्त आक डेवारीनुसार, रोजगारप्राप्त पुरु षांची संख्या २०११− १२ मध्ये ३०.४ क ोटी होती. २0१७−१८ मध्ये ती घसरू न २८.६ क ोटी झाली. त्याआधी दोन दशक ांत रोजगारात तब्बल ८.५ क ोटींची वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर रोजगारातील ही घसरण नजरेत भरणारी आहे.देशातील रोजगारांच्या संधी घटत असून, बेरोजगारी वाढत चालली असल्याचे श्रमशक्तीतील घसरणीतून दिसून येते. उच्चस्तरीय सूत्रांनीसांगितले क ी, २०१७−१८ मध्ये बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला आहे. २०११−१२ च्या तुलनेत त्यात २.२ टक्के वाढ दिसून येत आहे.श्रमशक्तीतील घसरण शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील घसरण ६.४ टक्के असून, शहरी भागातती ४.७ टक्के आहे.अप्रक ाशित क ालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणातील आक डेवारी सांगते क ी, शहरी भागातील ७.१ टक्के पुरु ष बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील ५.८ टक्के पुरु ष बेरोजगार आहेत.
१९९३−९४ नंतर प्रथमच कामकरी पुरुष घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 2:37 AM