Lokmat Money > बिझनेस न्यूज > करांबाबत नोकरदार वर्ग ‘अजाण’

करांबाबत नोकरदार वर्ग ‘अजाण’

देशातील कर भरणारा नोकरदार वर्ग हा उच्च उत्पन्नगट असलेला सुशिक्षित वर्ग आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:34 AM2018-04-30T05:34:59+5:302018-04-30T05:34:59+5:30

देशातील कर भरणारा नोकरदार वर्ग हा उच्च उत्पन्नगट असलेला सुशिक्षित वर्ग आहे.

The working class 'Ajan' | करांबाबत नोकरदार वर्ग ‘अजाण’

करांबाबत नोकरदार वर्ग ‘अजाण’

मुंबई : देशातील कर भरणारा नोकरदार वर्ग हा उच्च उत्पन्नगट असलेला सुशिक्षित वर्ग आहे. मात्र, या नोकरदार वर्गामध्ये करपात्र असलेला चारपैकी एक कर्मचारी करांबाबत (टॅक्स) अनभिज्ञ असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पगारावर लागू असलेला कर वाचवण्यासंदर्भात उपलब्ध असलेले पर्याय त्यांना माहीत नसतात, असे समोर आले आहे.
देशातील ७ शहरांतील १९४ कंपन्या व १ हजार २३३ कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. नेल्सन इंडियाने केलेल्या ‘झीटा एम्प्लॉयी बेनिफिट्स स्टडी’मध्ये एम्प्लॉयी टॅक्स बेनिफिट्स व त्याची भारतातील सद्य:स्थिती याविषयी सर्वेक्षण करण्यात आले.
कंपन्या देत असलेला सर्वात लोकप्रिय करविषयक लाभ टेलिकॉम रिइम्बर्समेंट हा आहे. त्यानंतर इंधन, एलटीए आणि गॅजेट रिइम्बर्समेंटचा क्रमांक लागतो. परंतु, कर्मचाºयांसाठी करविषयक रिइम्बर्समेंटचा विचार करता, ९४ टक्के कंपन्या अजूनही क्लिष्ट व वेळखाऊ असलेल्या कागदपत्रांवर आधारित प्रक्रियेचा अवलंब करतात. रिइम्बर्समेंट प्रक्रिया पूर्णत: डिजिटल असावी, असे मत ९० टक्के कर्मचाºयांनी व्यक्त केले. प्रत्यक्षात, पाहणी करण्यात आलेल्या कंपन्यांपैकी केवळ ६ टक्के कंपन्यांनी अशी सुविधा दिल्याचे चित्र आहे.
याबाबत झीटाचे सहसंस्थापक, रामकी गड्डपती म्हणाले, वेळखाऊ व क्लिष्ट पेपरवर्कमुळे अनेक कर्मचारी रिइम्बर्समेंटचे लाभ न घेण्याचा पर्याय अवलंबतात, कारण त्यांना या लाभाचा पूर्ण फायदा घेता येत नाही.

झीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन तुराखिया म्हणाले, ९० टक्के कर्मचाºयांना कागदपत्रांचा समावेश असलेल्या क्लेमऐवजी डिजिटल क्लेम सोयीचे वाटतात. देशातील डिजिटल वापरामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होत असताना कंपन्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल आणणे गरजेचे आहे. डिजिटल पद्धत अवलंबल्यास, प्रक्रिया जलद होईल, कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल व कार्यपद्धती पारदर्शक राहील.

Web Title: The working class 'Ajan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.