नवी दिल्ली : सॉफ्ट बँकेची गुंतवणूक असलेली कर्जाच्या विळख्यातील कोवर्किंग कंपनी ‘वुईवर्क ग्लोबल’ने अमेरिकेतील न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.
‘वुईवर्क’वर जूनच्या अखेरपर्यंत २.९ अब्ज डॉलरचे शुद्ध दीर्घ अवधी कर्ज होते. तसेच दीर्घकालीन भाडेपट्ट्यात कंपनीचे १३ अब्ज डॉलर अडकलेले होते. २०१९ मध्ये कंपनीचे बाजारमूल्य ४७ अब्ज डॉलर होते. मागील वर्षभरात कंपनीच्या समभागात ९६ टक्के घसरण झाली आहे. कंपनी दीर्घकालीन भाडे करारावर जागा घेते आणि अल्पकालीन करारावर भाड्याने देते. त्यात कंपनीला मोठा तोटा झाला आहे. (वृत्तसंस्था)
ग्लोबलपासून देशातील उद्योगा पूर्णत: स्वतंत्र
वुईवर्क इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करण विरवानी यांनी सांगितले की, अमेरिकेतील दिवाळखाेरी अर्जाचा कंपनीच्या भारतीय व्यवसायावर याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. कारण कंपनीचा भारतातील व्यवसाय ‘वुईवर्क ग्लोबल’पासून पूर्णत: स्वतंत्र आहे.
भारतातही व्यवसाय
वुईवर्कचे भारतातही काम आहे. वुईवर्क इंडियामध्ये एम्बेसी समूहाची ७३ टक्के, तर विवार्क ग्लोबलची २३ टक्के हिस्सेदारी आहे. नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांत कंपनीची ५० केंद्रे आणि ९० हजार डेस्क आहेत. ही सुविधा लोकप्रियही आहे.