Join us

चीनमुळे पुन्हा जगाला ‘ताप’! इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 8:54 AM

जगभरातील अर्थव्यवस्थांना पुन्हा मोठा फटका बसण्याची शक्यता.

बीजिंग : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शांघायसह चीनच्या अनेक औद्योगिक शहरांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमधून होणारी निर्यात ठप्प झाली आहे. याचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थांना बसण्याची शक्यता आहे.

औद्योगिक क्षेत्र ठप्प झाल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. त्यातच जागतिक मागणीही कमजोर झाली आहे. त्यामुळे चीनच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. चीनच्या सीमा शुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये चीनची निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.७ टक्क्यांनी वाढून २७३.६ अब्ज डॉलर राहिली. मार्चमध्ये ही वाढ तब्बल १५.७ टक्के होती. त्याचवेळी चीनची आयात ०.७ टक्क्यांनी वाढून २२२.५ अब्ज डॉलर झाली. गेल्या महिन्यातही ही वाढ १ टक्क्यापेक्षा कमी होती.

अमेरिका आणि इतर प्रमुख बाजारांतील वाढती महागाई आणि उच्च व्याजदर यामुळे चीनच्या वस्तूंच्या मागणीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने कोरोनाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. शांघाय आणि इतर अनेक औद्योगिक शहरांतील व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लोक घरात अडकून पडले आहेत.

मागणीही घटलीn कोरोना विषाणूमुळे जो अडथळा आला त्यामुळे नुकसान झाले आहेच, पण त्याबरोबरच विदेशातील मागणी कमजोर झाल्यामुळेही मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या तिमाहीत निर्यात आणखी कमी होईल, असा अंदाज आहे. n चीनमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पोलाद व अन्य साहित्यांची निर्यात होते. ही निर्यात कमी झाल्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :चीनकोरोना वायरस बातम्या